Breaking News

नवं कवी स्वप्नील बाविस्कर यांचा "शेतकरी माय बाप"काव्य संग्रह प्रा.वा.ना.आंधळे यांच्या हस्ते प्रकाशन

 


नवं कवी स्वप्नील बाविस्कर यांचा "शेतकरी माय बाप"काव्य संग्रह प्रा.वा.ना.आंधळे यांच्या हस्ते प्रकाशन 


नांद्रा ता.पाचोरा (प्रतिनिधी)             (प्रा यशवंत पवार) -           समाजामध्ये दिशा देण्यासाठी विविध प्रकारच्या  साहित्य लेखनाद्वारे सामाजिक लेखणी झिजत असते याच प्रकारे कवितांमधील  प्रासाद, ओज,माधुर्य, भाव,या काव्या लंकार व काव्य गुणांमधून समाजातील विविध प्रश्नांवर दिशा देण्याचं व दशा बदलावण्या ची ताकद आजही कवितांमध्ये असल्याचे आपल्या मनोगतातून सांगितले व याप्रसंगी त्यांनी विविध प्रकारच्या आरोह- अवरोह सोबतच उत्तम सादरीकरणाने व हास्याचे फवारे उडवून आपल्या स्वरचित कवितांचाही गुणगान गाऊन या ठिकाणी संपूर्ण काव्य साहित्यप्रेमींना एक प्रकारे  काव्य साहित्याची मेजवानीच दिली व जुने व नवीन काव्यांमध्ये नऊ रसाचे महत्त्व हसवत,खेळवत, रडवत साहित्यप्रेमी समोर अलगद उलगडले,या उद्घाटन


प्रसंगी कवी स्वप्नील बाविस्कर यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या "शेतकरी मायबाप" काव्यसंग्रहाचे प्रकाशन केले. याप्रसंगी कवी स्वप्नील बाविस्कर यांनीही आपल्याला  2002 पासून काव्याची  व कॉलेज जीवनामध्ये काव्याची गोडी कशी लागली ते आपल्या मनोगतुन मांडले

नांद्रा येथील जि.प.प्राथमिक शाळेत झालेल्या या काव्यसंग्रह प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून  माजी मुख्याध्यापक मोरसिंग राठोड, अशोक भाई बाविस्कर सरपंच अमोल सुर्यवंशी, उपसरपंच शिवाजी तावडे, माजी मुख्याध्यापक एस.पी.तावडे,ग्रा.प.सद्स्य किशोर पाटील, विनोद बाविस्कर, साहेबराव तावडे,जि.प.चे मुख्याध्यापक राजेंद्र गोसावी,एस.के.पाटील वाय.पी.पाटील,माजी मुख्याध्यापक ठाणसिंग पाटील , जगदीश महाजन , देविदास पवार,नाना पवळ ,नाना साखरे, पत्रकार नगराज पाटील, राजेंद्र पाटील ,प्रा.यशवंत पवार, यांच्या सह महेश गवादे,पी.एस.चौधरी,किरण सोनार, गजानन ठाकूर, केशव पेंटर,माधव पाटील, ज्ञानेश्वर साखरे,अभियंता राजेश राठोड, यांच्या सह असंख्य मान्यवर उपस्थित होते.

या वेळी १९९८ घ्या मंथन गृपचा गेट टुगेदर कार्यक्रम पार पडला.यात स्वप्निल बाविस्कर,विकास खैरनार, नंदकिशोर पाटील, दिपक सुर्यवंशी,भरत पाटील,अलिम पटेल, सुरेश पाटील, श्रीराम पवार ,करूणा भालेराव,अलका पाटील, मनिषा गवादे यांच्या सह माजी विद्यार्थी उपस्थित होते.

यशस्वीतेसाठी आत्माराम बाविस्कर, सुनिल बाविस्कर, पंकज बाविस्कर, प्रकाश नारायण गणेश बाविस्कर यांनी परीश्रम घेतले.सुत्रसंचलन गजानन ठाकूर सरांनी तर आभार कवी स्वप्निल बाविस्कर यांनी मानले.

No comments