Breaking News

असा असणार मुख्यमंत्री यांचा,"शासन आपल्या दारी "मिनिट टू मिनिट दौरा..!

 


..असा असणार मुख्यमंत्री यांचा,पाचोरा येथील "शासन आपल्या दारी "मिनिट टू मिनिट दौरा.!                                 (पाचोरा प्रतिनिधी-प्रा. यशवंत पवार ) दिनांक 12 सप्टेंबर वार मंगळवार रोजी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व अजित दादा पवार  व सोबत दहा कॅबिनेट मंत्री यांच्या उपस्थितीत  शासन आपल्या दारी हा तालुक्या स्तरावरील प्रथमच महाराष्ट्रातील पाचोरा येथे पहिला दौरा  सू निश्चित झाला असल्याने जळगाव जिल्हा पासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे  मिनिट टू मिनिट नियोजन मुख्यमंत्री सचिवालयाकडून प्राप्त झाले असल्याने त्याप्रमाणे मुख्यमंत्री यांचे दुपारी 12. वा वाजता  जळगाव विमानतळ येथे आगमन होईल त्यानंतर हेलिकॉप्टर च्या साह्याने जळगाव वरून  हडसन शिवार येथे हडसन हेलिपॅड वर आगमन त्यानंतर हडसन शिवार येथून मोटारीने एम एम कॉलेज पाचोरा मैदान  कडे निर्धारित "शासन आपल्या दारी" कार्यक्रमात 12.30वा उपस्थित राहतील त्यानंतर दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी मौजे नांद्रा तालुका पाचोरा येथे नर्मदा ऍग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे उद्घाटन साठी नांद्रा येथे त्यानंतर,महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या एमआयडीसीचे मौजे निंभोरा नगरदेवळा स्टेशन जवळ तालुका भडगाव  व पाचोरा येथे 50 काठांचा उपजिल्हा रुग्णालय यांचे      ई- भूमिपूजन यानंतर दुपारी 3.30वाजता मोटारीने हडसन शिवारातील  हेलीपॅडकडे प्रस्थान हेलिकॉप्टरने जळगाव विमानतळाकडे तीन पंचेचाळीस वाजता प्रस्थान व तेथून 4 वाजता विमानाने मुंबईकडे प्रस्थान  या प्रकारे अधिकृत माहिती मुख्यमंत्री सचिवालय  यांच्याकडून निर्गमित केलेल्या 9 सप्टेंबर पत्राद्वारे प्राप्त झाल्या अ सून निर्धारित दौऱ्याचे नियोजन करण्यासाठी  पाचोरा भडगाव चे आमदार किशोर आप्पा पाटील तसेच मुंबई सचिवालय वरून आलेले प्रशासकीय अधिकारी, संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे  प्रशासकीय अधिकारी,  व पाचोरा तालुक्याचे  अधिकारीसह संपूर्ण कर्मचारी   यंत्रणा, जिल्हा पोलीस विभाग यंत्रणा कामाला लागले असून आज सायंकाळपर्यंत हडसण शिवार येथे दोन हे लिपॅड रस्त्याला लागूनच निर्माण करण्यात आले आहेत

No comments