पोळ्याच्या पूर्वसंध्येलाही बैलपोळा चे सजावटीच्या दुकानांवर शुकशुकाट, जुन्याच वस्तू रिपेरिंग कडे शेतकऱ्यांचा कल
पोळ्याच्या पूर्वसंध्येलाही, बैलपोळा चे सजावटीच्या दुकानांवर शुकशुकाट, जुन्याच वस्तू रिपेरिंग कडे शेतकऱ्यांचा कल. पाचोरा(प्रतिनिधी-प्रा. यशवंत पवार ) सालाबादाप्रमाणे यावर्षीही निसर्गाच्या लहरीपणा पुढे पुन्हा बळीराजा पीळला गेला आहे "वरून राजा केव्हा गरजतो,केव्हा बरसतो, तर केव्हा महिना महिना रुसतो अशा स्थितीमध्ये तब्बल तीन महिने पूर्ण होण्यास आले तरी पावसाचा जोर पाहिजे तसा अजूनही होत नसल्याने शेतकऱ्यांचा व विशेष करून बैल राजाचा सण असलेला बैल पोळा यावर्षी मंदीच्या सावटाखालीच जाण्याचं वातावरण दिसत आहे,नांद्रा येथील बैलपोळ्याच्या शृंगार साठी पारंपारिक पद्धतीने अनेक प्रकारचे शृंगार साहित्य, गोंडा, नाथा,मोरक्या, घुंगरू माळ,पट्टा,गोप दोरी आणणारे सद्गुगुरु हार्डवेअरचे संचालक विनोद आप्पा बाविस्कर यांना याविषयी प्रतिक्रिया
दिली याबरोबरच गावातील आदर्श शेतकरी विश्वनाथ लोटन सूर्यवंशी यांनी ही प्रतिक्रिया दिली
सोबतच माजी उपसरपंच सखाराम तुकाराम पाटील माजी,उपसरपंच वसंत बळीराम सूर्यवंशी,भागवत पाटील, दादाभाऊ बोरसे,गजानन पंडित बाविस्कर यांनीही यावर्षीही दुष्काळाच्या सावट मध्ये शेतकरी हवालदील असल्याने मोजक्याच बैलांच्या शृंगारिक वस्तू घेऊन जात असल्याचे सांगितले,त्यामुळे एकंदरीत दमदार पावसाची प्रतीक्षा अजूनही आपल्या खानदेशात लागून राहिलेली आहे त्यामुळे बैलपोळ्याच्या पूर्वसंध्येला बाजारपेठांमध्ये शुकशुकाट दिसत आहे याबरोबरच या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने चर्मकार व्यवसाय करणारे सुखदेव बाबा
पटाईत यांच्याकडेही पट्ट्यांना घुंगरू लावणे, नाथी, गेज, साखळी, पैंजण,दुरुस्तीचे कामे येत असल्याचे सांगून, जुनेच वस्तू रिपेअर करून वापरण्यासाठी शेतकरी वर्ग या वर्षाचा पोळा भागवण्याचेही जास्त प्रमाणात दिसत असल्याने बळीराजा यावर्षी आपल्या सर्जा राजाला जुन्याच शृंगारिक वस्तूवर भागवत असल्याचे अद्याप तरी चित्र दिसत आहे


No comments