Breaking News

नांद्रा येथे अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहास आजपासून प्रारंभ


नांद्रा येथे अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहास आजपासून प्रारंभ 
         पाचोरा(प्रतिनिधी)-                    येथील श्री महादेव महाराज कृपेने व श्रद्धेय श्री कल्याणदासजी महाराज,1008 विष्णूदासजी महाराज व  सर्व ग्रामदैवत यांच्या आशीर्वादाने अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह प्रारंभ दि.9 सप्टेंबर वार गुरुवारपासून होत आहे, सालाबादप्रमाणे  पिठोरी अमावस्या पोळ्याला अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात येत असते याप्रसंगी महाराष्ट्रातील दिग्गज हरिभक्त परायण कीर्तनकार महाराज या ठिकाणी कीर्तनाची सेवा देत असतात या निमित्ताने यावर्षी गुरुवार दिनांक 14 सप्टेंबर पासून संकीर्तन सप्ताह प्रारंभ होत असून या वर्षी सप्तापूजेसाठी संजय राम गोविंद बागुल यांच्या हस्ते देण्यात होणार आहे तर संपूर्ण सप्ताहाचे पूजा अर्चा विधी आचार्य श्री दिनकरजी खुरे यांच्या मार्गदर्शनाने होणार आहेत दि 14 सप्टेंबर रोजी हभप कीर्ती ताई महाराज शेवगेकर, दिनांक 15 सप्टेंबर ह भ प गोपाल महाराज डोणगावकर, दिनांक 16 सप्टेंबर ह भ प प्रल्हाद महाराज कळमसरेकर,दि 17 सप्टेंबर बाल कीर्तनकार ह भ प श्वेताताई दुधे महाराज साळवेकर, दिनांक 18 सप्टेंबर ह भ प भागवताचार्य कैलासजी महाराज कुरंगीकर,दिनांक 19 सप्टेंबर हभप बापू महाराज पातोंडेकर, दिनांक 20 सप्टेंबर ह भ प माधुरीताई शेरेकर सावरगावकर, दिनांक 21 सप्टेंबर ह भ प मनोज महाराज दुसखेडेकर (यावल ) व काल्याचे कीर्तनाचा आयोजन करण्यात आलेला आहे तरी दिनांक 21 सप्टेंबर रोजी सकाळी 5 वाजता काकड आरती,सकाळी 9 ते 11 ह भ प मनोज महाराज दुसखेडेकर यांचे काल्याचे किर्तन व सायंकाळी पाच वाजता पालखी सोहळा व रात्री नऊ वाजता भारूड व गवळणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे व दुपारी 12 ते 5 वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलं आहे तरी परिसरातील सर्व  भाविक भक्तांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन महादेव मंदिर संस्थान अध्यक्ष सुभाष आप्पा बाविस्कर व सचिव बापू सर सूर्यवंशी व समस्त कमिटी, महादेव भजनी मंडळ, महिला भजनी मंडळ व व समस्त ग्रामस्थ मंडळी नांद्रा तालुका पाचोरा त्यांच्याकडून करण्यात आलेले आहे

No comments