Breaking News

आसनखेडा जि.प.प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप (सामाजिक दातृत्व म्हणून पोलीस निरीक्षक मंगेश पाटील यांचा शैक्षणिक उपक्रम)

       
 आसनखेडा जि.प.प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप               (सामाजिक दातृत्व म्हणून पोलीस निरीक्षक मंगेश पाटील यांचा शैक्षणिक उपक्रम)

नांद्रा.पाचोरा  (प्रतिनिधी )    आसनखेडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत येथील मंबई पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेले आसनखेडेचे भूमिपुत्र मंगेश भिमराव बोरसे यांनी इयत्ता पहिली ते सातवी च्या ११५ विद्यार्थ्यांना व अंगणवाडी च्या  व विद्यार्थ्यांना शालेय स्कूल बॅगांचे वाटप भीमराव बंडू पाटील (कारभारी) यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाले

मागील वर्षी सुद्धा पोलिस निरीक्षक मंगेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना स्कूल बॅगांचे वाटप केले होते. मातृ -पितृ ऋण, देव ऋण व समाज ऋण फेडणे आपलं कर्तव्य असतं व त्याच उदात्त हेतूतून आपण अशा समाजाचे काही तरी देण लागतो या उद्दात्य हेतूने मंगेश पाटील यांचे कार्य कर्तुत्व व दातृत्व म्हणून पंचक्रोशीतील नेहमी विधायक उपक्रमासाठी गावात एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून नेहमी प्रेरणादायी ठरत असते,
या  कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून भीमराव बंडू पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून  शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष विरेंद्र पाटील,सुपडू पाटील, उपसरपंच अशोक पाटील, अशोक हरी पाटील,वाशिम खान, प्रकाश पाटील, बापू पाटील, कैलास पाटील,ज्ञानेश्वर  कौतिक रायगडे,बबन पाटील,ईश्वर पाटील,प्रेमराज पाटील,सुरज पाटील, नांद्रा जि.प.शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष स्वप्निल बाविस्कर,पत्रकार राजेंद्र पाटील,नगराज पाटील,प्रा.यशवंत पवार यांच्या सह ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थितांचे स्वागत मुख्याध्यापक दिलीप पाटील यांनी केले तर सुत्रसंचलन शिक्षिका शितलताई सोनवणे यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षिका वृंद शितल सोनवणे, दिपाली डाळवाले, ज्योती चौधरी यांनी परिश्रम घेतले

No comments