ई पीक पेरा नोंदविण्यासाठी आता 25 सप्टेंबर पर्यंत मुदत वाढ नांद्रा ता.पाचोरा (प्रतिनिधी-प्रा यशवंत पवार)- केंद्र शासनाच्या डिजिटल क्रॉप सर्वे पायलट प्रकल्प शेतकरी स्तरावरील खरीप पिकांसाठी ई पिक पेरा नोंदवण्यासाठी अगोदरचा कालावधी 15 सप्टेंबर पर्यंत होता परंतु त्याची आता मुदत वाढ होऊन ती शेतकऱ्यांनी दिनांक 25 सप्टेंबर 2023 पर्यंत आपल्याला पायलट मोबाईल ॲप द्वारे ई पिक पेरा नोंदवण्याचा आवाहन जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्फत करण्यात आलेले आहे. इ पीक पेरा, पीक विमा, अतिवृष्टीसाठी, व इतर नैसर्गिक आपत्ती मुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी ऑनलाइन नोंद झालेली असणे आवश्यक असल्याने शेतकरी बांधवांनी वाढवलेल्या मुदतीत पीक पेरा करणे गरजेचे आहे, परंतु काही शेतांमध्ये सर्वर चा प्रॉब्लेम नेटवर्क चा प्रॉब्लेम या अनेक तांत्रिक बाबींमुळे अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची पीक ई पीक पेरा नोंदवला नसल्याने ही वाढीव मुदत देण्यात आलेली आहे,याबरोबरच मागील वर्षीची 2022 ची अतिवृष्टीची सुद्धा पाचोरा तालुक्यातअनेक शेतकऱ्यांचे रब्बी पिकांचे नुकसान होऊन पंचनामे होऊन माहिती शासनाने दरबारी नोंद असल्यानेही नुकत्याच घोषित केलेल्या अतिवृष्टी निधीत पाचोरा तालुक्यातील अद्याप कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात 2022 चा अतिवृष्टी निधी प्राप्त झाल्या नसल्यामुळे शेतकरी यांनी तो तात्काळ खात्यात जमा करण्याची मागणी संबंधित अधिकारी व पदाधिकारी यांच्याकडे केली आहे
No comments