कुरंगी येथे हस्तकलाद्वारे सुंदर गणपतीची निर्मिती करून कुंभार समाज करत आहेत आपल्या उदरनिर्वाचे साधन
कुरंगी येथे हस्तकलाद्वारे सुंदर गणपतीची निर्मिती करून कुंभार समाज करत आहेत आपल्या उदरनिर्वाचे साधन नांद्रा ता. पाचोरा - (प्रतिनिधी-प्रा यशवंत पवार ) कुरंगी तालुका पाचोरा म्हटलं म्हणजे आपल्या डोळ्यासमोर येते ती देवांची कुरंगी नावाप्रमाणेच या ठिकाणी अनेक प्रकारचे परमार्थिक धार्मिक व अध्यात्मिक कार्यक्रम नेहमी होत असतात याच अनुषंगाने या गावात अनेक प्रकारचे सत्संग ही चालतात स्वाध्यायही गावात प्रत्येक पारमार्थिक मंदिरांची उभारणी करण्यात आलेली आहे,त्यामध्ये अजून भर म्हणून दत्ताचे भव्य दिव्य सुंदर मंदिर उभारणीस प्रारंभ झाला आहे, गावात चार हरि भक्त परायण कीर्तनकार महाराज यांच्या मार्गदर्शनाने गावात कीर्तन प्रवचन ही होतात,साखरे गुरुजींसारखे विद्वत्त आचार्य ब्राह्मण गावाला लाभलेले व अशाच या बारा बलुतेदारी व्यवसाय उद्योग करून, उद्योगी गावाची ओळख असलेल्या कुरंगी गावांमध्ये कुंभार बंधू हे प्रत्येक सणवारला
आपल्या हस्तकलाच्या कौशल्याने कधी आखाजीला घागरी तर कधी थंड पाण्याचे माठ,रांजण, दिवाळीला लक्ष्मी,पणती, गुलाबाया, पोळ्याला बैल अशा अनेक सुबक व कलाकृतीच्या मूर्ती बनवतात तर आता त्यांनी सुंदर,सुबक व माफक दरात मातीचे गणपती बनवून परिसरामध्ये एक आकर्षक छोटा हस्त व्यवसाय म्हणून आपलं नावलौकिक केलेले आहे
त्यामुळे नांद्रा परिसरात यावेळेस छोटे गणपती घरी बसवण्यासाठी लोकांचा कल कुरंगी गावातीलच सुंदर सुबक व माफक दरात असणाऱ्या इको फ्रेंडली मातीच्या गणपतींना खरेदी करण्याचा आहे त्यामुळे आपले उदरनिर्वाच साधन म्हणून या कुरंगीतील कुंभार समाज आजही आपलं सुंदर असं हस्त कौशल्य वापरून समाजामध्ये आपली एक ओळख कायम ठेवत आहे



No comments