Breaking News

नांद्रा येथे कै. अण्णासाहेब जे.के.पाटील यांच्या स्मारकाच्या पुतळ्याचे लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न

                                                नांद्रा येथे कै. अण्णासाहेब जे.के.पाटील यांच्या स्मारकाच्या पुतळ्याचे लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न                                        नांद्रा पाचोरा                        (प्रतिनिधी-प्रा यशवंत पवार )          येथे कै. अण्णासाहेब जयराम काळू पाटील (जे के अण्णा माजी तालुका कृषी अधिकारी पाचोरा ) यांचे पुतळायचं अनावरण व स्मारक लोकार्पण सोहळा दिनांक 24 सप्टेंबर रोजी लक्ष्मी ऍग्रो केमिकल नांद्रा, तुळजाभवानी मंदिर जवळ कृषी भूषण विश्वासराव पाटील लोहारा यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे म्हणून वैशालीताई सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला

,प्रथम पुतळ्याची पूजा स्थापना विधिवत आचार्य भालचंद्र महाराज वेरुळी कर यांच्या हस्ते संपूर्ण झाले,

त्यानंतर पुतळ्याचा अनावरण, पूजन व माल्यार्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यामध्ये  आबासाहेब कृषी भूषण विश्वासराव पाटील व वैशालीताई सूर्यवंशी डॉ. दीपक पाटील,बाळासाहेब सूर्यवंशी, नानासाहेब सूर्यवंशी, निशिकांत सूर्यवंशी,बीके भाऊसाहेब, एडवोकेट काटकर साहेब,परदेशी काका, सौ कल्पनाताई सूर्यवंशी, सौ संध्याताई सूर्यवंशी, संजय सूर्यवंशी,माधव

सूर्यवंशी, दिलीप सूर्यवंशी, शरद पाटील व गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ ग्रामस्थ,नातेवाईक, आप्तेष्ट यांनी पुष्पहार व फुले अर्पण करून अभिवादन केले  याप्रसंगी सौ वैशाली ताई सूर्यवंशी या भावनिक झाल्या त्यानीं मनोगत व्यक्त करताना एक पुतळा म्हणजे शक्तिपीठ असते तात्या साहेबांचा पुतळा पाहिल्यावर मलाही जसे ऊर्जा मिळते त्याच प्रकारे जळगाव येता जाता येथे अण्णांची पुतळ्याचे दर्शन मी घेत जाऊन अधिक ऊर्जा मिळेल याबरोबरच या भवानी मंदिराच्या सुंदर परिसरात त्यामुळे अजून त्यामध्ये अण्णांच्या पुतळ्याने प्रत्येकाला विधायक कार्य करण्याची  प्रेरणा मिळेल अशा आपल्या भावनिक मनोगतातून व्यक्त होताना सांगितले याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. यशवंत पवार यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक  लक्ष्मी अग्रो केमिकल चे संचालक बाळासाहेब सूर्यवंशी यांनी केले त्यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की अण्णा साहेबांनी केलेल्या मार्गदर्शनातून 26 जानेवारी 1996 रोजी कृषी सम्राट नावाची छोटी आहे फुटामध्ये निर्माण झालेली कंपनी व अवघे पाच प्रोडक सुरू केलेले  कृषी सम्राट चे

कीटकनाशक आज देश विदेशात 125 कृषी औषध निर्मिती करून नावारूपाला आल्याचे सांगून याबरोबरच पाईप कंपनी, ठिबक कंपनी अण्णा साहेबांच्या आशीर्वादने व मार्गदर्शनाने नावारूपाला आले आहेत व त्यामुळेच कृषी सम्राट हा ब्रँड आज 27 वर्षानंतरही संपूर्ण भारतभर यशस्वी टिकाव धरुण असल्याचे आपल्या मनोगतातून सांगितले याप्रसंगी कृषीभूषण विश्वासराव पाटील यांनीही अण्णा साहेबांच्या समवेत

केलेले विविध प्रकारचे कृषी विषयक अभ्यास दौरे व त्यातून निघाली फलनिष्पत्ती म्हणूनच कृषी सम्राट नावारूपाला आल्याचे सांगून  अण्णासाहेब  व्यक्ती समजण्यासाठी त्यांच्या जीवनावर चरित्र लिखाण करणे गरजेचे असल्याचे सांगितले,त्याला दुजोरा म्हणून याप्रसंगी निशिकांत जयराम सूर्यवंशी यांनी जेके आण्णा यांच्या जीवन प्रवासावर जीवन चरित्र लिहिण्याचे कार्य आपल्या हाती

घेतल्याचं आश्वासित करून ज्यांनी अण्णासाहेब अनुभवले असतील त्यानींही त्यांचे विचार त्या चरित्रात मांडण्यासाठी द्यावेत असे आवाहन केले  याप्रसंगी अण्णासाहेबांच्या जीवनपटावर बापूसाहेब पुणे,डॉ दीपक पाटील,डॉ.भाग्यश्री सूर्यवंशी,सौ संध्या सूर्यवंशी,श्री संजू आबा सूर्यवंशी, श्री विश्वासराव पाटील, परदेशी काका,एडवोकेट काटकर दादा, यांनी यथोचित मनोगते व्यक्त करून त्यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला याप्रसंगी गावातील ग्रामपंचायत कमिटी सदस्य,तंटामुक्ती अध्यक्ष,पोलीस पाटील,ज्येष्ठ शेतकरी, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, क्षेत्रातील परिसरातील मान्यवर व पदाधिकारी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते आभार प्रदर्शन संचालक नानासाहेब सूर्यवंशी यांनी केले.

No comments