Breaking News

नांद्रा परिसरात 23 व 24 सप्टेंबर च्या अतिवृष्टी मुळे खरीप पिके उध्वस्त, लाल्या व बोंड अळीचा प्रादुर्भाव, पिक विमा भरपाई ची मागणी


नांद्रा परिसरात 23 व 24 सप्टेंबर च्या अतिवृष्टी मुळे खरीप पिके उध्वस्त, लाल्या व बोंड अळीचा प्रादुर्भाव, पिक विमा भरपाई ची मागणी   
                                  नांद्रा ता. पाचोरा -                (प्रतिनिधी-प्रा यशवंत पवार )          येथे दिनांक 23 व 24 सप्टेंबर रोजी नांद्रासह आसनखेडा, कुरंगी,पहान हडसन व इतर गांवात  परिसरात जोरदार अतिवृष्टी झाली असून अजूनही शेतामध्ये पाणी तुंबलेला असून त्यामुळे शेतीमध्ये कपास, मक्का, ज्वारी व इतर  खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे  त्यामुळे पिकांवर लाल्या रोग बोंड अळीचा प्रादुर्भाव फळपिक आडवी झालेले मकाच्या कणसात मोठ्या प्रमाणात आळ्या चा प्रादुर्भाव, पिके उभाळणे

तरी एक रुपयात  प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी  सीएससी सेंटर, बँक येथून एक रुपयात वीमा काढला असून आता आज 72 तास होत आले असून ज्या शेतकऱ्यांना खरीप पिकाचे नुकसान झाले आहे त्यांनी मोबाईल द्वारे  ऑनलाइन क्रॉप इन्शुरन्स या  ॲप्स वरून नुकसान झालेले पिके ऑनलाईन पिक विमा आयडी टाकून नोंदवलेले आहेत परंतु

अजूनही बरेच शेतकरी अनभिज्ञ असून त्यांच्याजवळ अँड्रॉइड मोबाईल नाही किंवा इंटरनेट व इतर तांत्रिक बाबींमुळे ते ऑनलाईन नुकसान झालेले क्रॉप ॲप्स वर टाकू शकत नाही याबरोबरच ओरिएंटल कंपनीचे टोल फ्री नंबरही काही वेळेस लागतात तर काही वेळेस बिझी असतात त्यामुळे तेथूनही तात्काळ शेत पिके नुकसानाची माहिती टोल फ्री नंबर वर देता येत नाही याबरोबरच अजून ही मोठ्या प्रमाणात पावसाच्या सरीवर सरी येत असल्याने क्षेत्ररस्ते पाण्याने तुडुंब भरले असल्याने शेतात जायला सुद्धा रस्ता  नाही मिळत आहे तरी अशा सर्व अतिवृष्टी ग्रस्त

शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामां शासन स्तरावरून करून,योग्य ती विमा भरपाई मिळण्याची मागणी विमाधारक शेतकरी वर्गाकडून होत आहे

No comments