Breaking News

महालक्ष्मी दुर्गा मंडळ निभवते सामाजिक उत्तरदायित्व भारी, धार्मिकतेचाही वारसा जोपसते खांद्यावरी.


महालक्ष्मी दुर्गा मंडळ निभावते सामाजिक उत्तरदायित्व भारी, धार्मिकतेचाही वारसा जोपासते खांद्यावरी.                                नांद्रा ता. पाचोरा प्रतिनिधी            (प्रा. यशवंत पवार )                   येथील महालक्ष्मी दुर्गा मित्र मंडळ गेल्या 20 वर्षापासून नांद्रा येथे महाराष्ट्रातून नव्हेच तर महाराष्ट्राच्या बाहेरूनही विविध देवींच्या शक्ती पिठ्ठ असणाऱ्या पायी ज्योत आणण्यासाठी कोणत्याही एका घटकावर अवलंबून नसताना, कष्टकरी,मोल मजुरी करून स्व कमाई बरोबरच ग्रुप मधील नोकरदार, व्यावसायिक, गावाशी नाळ जुळणारे 20 वर्षापासून संपर्कात असणारे गल्लीतील बालमित्र यांच्या सहकार्याने आज तब्बल 20 वर्षे

होऊनही अवघे अखंड देवी माता ची ज्योत विविध राज्य व देशामधून आणून फक्त धार्मिकताच जोपासत नसून ते यामागे वर्षभरातून विविध शैक्षणिक,सामाजिक, सांस्कृतिक, महिला जनजागृती व स्त्रीभुर्ण हत्या जनजागृती, स्वच्छता अभियान अशा विविध सामाजिक उपक्रमातही आपला सहभाग नोंदविता असतात याच महालक्ष्मी दुर्गा मंडळाने आज पावेतो,माता जोगेश्वरी, श्री मनुदेवी माता , श्री माहूरगड माता ,श्री तुळजापूर माता , श्री कोल्हापूर माता ,श्री वनी गडदेवीमाता,श्री एकविरा माता, श्री मायजी माता, श्री पावागड कालिंका माता,श्री धार कालिंका माता अशा ठिकाणावरून पायी ज्योत आणून गावात अखंड एकात्मता

नांदावी, सुख समृद्धी नांदावी म्हणून या तेजोमय ज्योती आणून वातावरण मंगलमय व निरोगी मई करत असतात  याबरोबरच सुरुवातीला 20 वर्षांपूर्वी ज्या उदात्त हेतूने स्वर्गवासी इंदर शेट कर्नावट मारवाडी यांनी आपल्या वाड्यामध्ये या दुर्गा मंडळाची स्थापना केली होती त्या ठिकाणापासूनच त्या वेळेपासून त्यांनी अनिष्ट,अंधश्रद्धा, रुढी यांना बगल देण्यासाठी वेगवेगळे विज्ञानवादी सामाजिक देखावे,मानवी मनोरे उभे करून गावाला एक वैज्ञानिक डोळस दृष्टिकोन दिला होता व त्याच अनुषंगाने आज त्यांची तिसरी पिढी म्हणजेच धनलक्ष्मी ज्वेलर्स संचालक गणेश कर्नावट व यासोबत सत्संगी सदविचारी आत्माराम सिताराम बोरसे या वटवृक्ष असणाऱ्या कुटुंबांनी आपल्या समवेत असणारे सर्व मित्र परिवार व संपूर्ण गावातील सर्व बांधव यांना एका माळेत गुंफून आज एकोप्याने हीच परंपरा पुढे आबादी ठेवत महालक्ष्मी दुर्गा मित्र मंडळ यांनी मग मराठी शाळेचे डिजिटल करण्याचे कार्य असो, मुलींच्या जन्मावर मातांचा सन्मान करणार कार्य असो, गावाच्या

सप्ताह निमित्त गावात सुंदर फुल हार डेकोरेशन सह  नामकरण डिजिटल एलईडी किट असो  किंवा कोणाच्या कुटुंबावर नैसर्गिक आपत्ती आले असेल किंवा आपत्कालीन परिस्थितीत निर्माण झाली असेल त्यासाठी प्रत्येक

महालक्ष्मी सदस्य आपला खारीचा वाटा म्हणून दिलेला मोबदला त्यात आर्थिक स्वरूपात देत असतो यासाठी गावातून शंभरच्या वर तरुणाची सक्रिय असलेली टीम म्हणजेच महालक्ष्मी मित्र मंडळ होय अशा कार्यक्रमातून त्यांनी आपला वेगळी ओळख गावात निर्माण केले असल्यामुळे आज नांद्रा गावात महालक्ष्मी दुर्गा मंडळ यांचे सर्व सदस्य चर्चेचे विषय बनत असून

निस्वार्थ,निष्काम,सेवा करणे म्हणून आज त्यांच्याकडे गावातील प्रत्येक व्यक्ती पाहत आहेत

No comments