विद्यार्थ्यांनी घेतली अग्नि पंख लावून चंद्रावर गगन भरारी- सामनेर येथे आमदार किशोर आप्पा पाटील व सावित्री बाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक उपक्रम व फिरते विज्ञान प्रदर्शन कार्यक्रम उत्साहात*
विद्यार्थ्यांनी घेतली अग्नि पंख लावून चंद्रावर गगन भरारी- सामनेर येथे आमदार किशोर आप्पा पाटील व सावित्री बाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक उपक्रम व फिरते विज्ञान प्रदर्शन कार्यक्रम उत्साहात
नांद्रा.पाचोरा (प्रतिनिधी -प्रा. यशवंत पवार ) सामनेर येथील महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सामनेर येथील शाळेच्या आवारात पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर आप्पा पाटील व सावित्री बाई फुले विद्यापीठ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा व विज्ञानाची गोडी लागावी यासाठी भविष्यात नवीन तंत्रज्ञान निर्माण करण्यासाठी उपयोग व्हावा म्हणून शैक्षणिक उपक्रम व फिरते विज्ञान प्रदर्शन कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमास सामनेर व कुरंगी केंद्रातील विविध शाळांसाठी विविध विज्ञानाचे प्रयोगांचे सादरीकरण व माहिती देण्यात आली यावे यावेळी विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी व प्रत्यक्षात त्याची अनुभूती होण्यासाठी ज्याप्रमाणे हिमालय अतिशय थंड आहे असे सांगण्यासाठी शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या हातावर प्रत्यक्ष बर्फाचा गोळा दे ऊन त्यांना त्याची बर्फाची अनुभूती घेऊन मगच थंड ही संकल्पना स्पष्ट करता येते याच प्रकारे या ठिकाणी पुण्याचे आलेले
सावित्रीबाई फुले विद्यापीठातील गायडन्स करणारे टीचर्स यांनी इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांपैकी अनेक विद्यार्थ्यांना स्टेजवर बोलवून त्या ठिकाणी कुकरमध्ये विविध प्रकारचे वायू यांचे रासायनिक समीकरण करून,प्रक्रिया करून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या अवतीभवती कृत्रिम ढगांचा वलय निर्माण करून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष थंडावा, गारवा जाणवून,धुकेच आजूबाजूला असल्याची जाणीव होऊन आपण चंद्रावर असण्याची आल्हाददायक कबुली विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष दर्शनी दिली, याबरोबरच विविध प्रकारचे प्रयोग करून त्यांनी वैज्ञानिक डोळस
दृष्टिकोन विद्यार्थ्यांसमोरमांडला .यावेळी मा.जि.प.सदस्य पदमबापु पाटील, महात्मा गांधी विद्यालय स्थानिक चेअरमन बाळकृष्ण पाटील उपसरपंच रवींद्र साळुंखे ग्रामपंचायत सदस्य साहेबराव पाटील, महेंद्र साळुंखे, पहान येथील विलास पाटील कुरंगी चे सरपंच पती नगराज पाटील, पत्रकार राजेंद्र पाटील,प्रा. यशवंत पवार बाबुलाल पटेल लासगाव, नाना पाटील पोलिस पाटील लासगावं येथील अवी पाटील व सामनेर केंद्रातील केंद्रप्रमुख धीरज पाटील, कुरंगी केंद्राचे केंद्रप्रमुख अनिल बी जाधव, फिरत्या विज्ञान प्रयोग शाळेमध्ये सामनेर केंद्रातील 9 जिल्हा परिषद व 3 माध्यमिक शाळांचा सहभाग होता तर कूरंगी केंद्रामध्ये 8 जिल्हा परिषद शाळा व 4 माध्यमिक शाळांनी सहभाग कार्यक्रम यशस्वीतेसाठी महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र भोसले पर्यवेक्षक एस. बी. पाटील सर व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले याप्रसंगी विद्यार्थ्यांना वेळोवेळी वैज्ञानिक प्रयोग करून झाल्यानंतर पुस्तके देऊनही कौतुक करून गौरवण्यातही आले



No comments