Breaking News

देवाची कुरंगी येथे दिनांक 18 डिसेंबर पासून श्री गुरुदेव दत्त महाराज स्थापना व मंदिराचा प्राणप्रतिष्ठान सोहळा प्रारंभ

 

देवाची कुरंगी येथे दिनांक 18 डिसेंबर पासून श्री गुरुदेव दत्त महाराज स्थापना व मंदिराचा  प्राणप्रतिष्ठान सोहळा प्रारंभ 
                                          नांद्रा ता. पाचोरा (प्रा. यशवंत पवार)  कुरंगी देवाची येथे दिनांक 18 डिसेंबर ते 28 डिसेंबर दरम्यान यात्रोत्सव,  अखंड हरिनाम कीर्तन, यज्ञ, रामायण,सुंदर कांड पाठ,पारायण वाचन पाठ, हरिपाठ,काकडा,आरती, महापूजन,मिरवणूक असे विविध धार्मिक कार्यक्रमातून देवाची कुरंगी या ठिकाणी उत्साहात नवनाथ दरबार श्री गुरुदेव दत्त महाराज यांची पंचधातू असलेली 550 किलो ची  मूर्ती स्थापना व मंदिराची प्राणप्रतिष्ठा भव्य दिव्य सोहळा उत्साहात संपन्न होणार आहे, या मंदिराच्या सेवेसाठी श्री समर्थ सद्गुरु बालयोगी श्री सिद्धेश्वर सिंग महाराज मठाधिपती यांच्या यांच्या आदेशित नवनाथ दरबार भगवंत श्री गुरुदेव दत्त महाराज यांची पंचधातू मूर्तीची स्थापना व भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा दिनांक 19 डिसेंबर वार मंगळवार रोजी स्थापना सोबतच सर्व गृह देवतांचे पीठ स्थापना, अग्नी स्थापना, धान्यदीवास , जलादीवास, निद्रादीवास संपन्न होणार आहे या मूर्तीचे स्थापना व प्राणप्रतिष्ठान आचार्य साखरे गुरुजी कुरंगीकर व आचार्य श्याम गुरुजी सह 11 ब्राह्मण यांच्या मंत्रोच्चाराने संपन्न होणार आहे कार्यक्रमाचा प्रारंभ दिनांक 18 डिसेंबर वार सोमवार रोजी सकाळी 7. वाजता गाणगापूर येथून भव्य दिव्य ज्योत मशाल पायी वारी दाखल होणार आहे याबरोबरच दिवसभर अखंड हरिनाम कीर्तन, यज्ञ सोहळा,संगीतमय रामायण सुंदर कांड पाठ, दररोज पहाटे काकडा, भजन,आरती, हरिपाठ, वह्या आयोजन करण्यात येणार आहे याबरोबरच दिनांक 13 डिसेंबर पासून यात्रोत्सव ला प्रथम वर्षी प्रारंभ होणार आहे याबरोबरच महाराष्ट्रातील नामांकित ह भ प कीर्तनकार महाराज किर्तन रुपी सेवा देणार आहेत त्यामध्ये दि.18 डिसेंबर रोजी ह भ प नानासाहेब मुकुंद महाराज,दिनांक 19 डिसेंबर ह भ प कीर्तन केसरी कीर्ती ताई बोरसे पारोळेकर, दिनांक २० डिसेंबर रामायणाचार्य हभप गोविंद जी महाराज वरसाडे कर, 21 डिसेंबर सह्याद्री भूषण हभप भाग्यश्रीताई तायडे अडावदकर, दिनांक 22 डिसेंबर ह भ प ज्ञानेश्वर महाराज गोरार खेडेकर, 23 डिसेंबर विनोदाचार्य सुभाष महाराज निंबोरीकर, 24 डिसेंबर भागवताचार्य गोविंद महाराज कुरंगी कर, 25 डिसेंबर विनोदाचार्य संजीवनी ताई राजपूत हळदेकर,26 डिसेंबर रामाय नेचार्य माधुरीताई शेरेकर, 27 डिसेंबर भागवताचार्य ब्रह्मनिष्ठ सुधाकर महाराज शास्त्री आळंदीकर व 28 डिसेंबर खानदेश भूषण ह भ प ज्ञानेश्वर महाराज किर्तन केसरी जळकेकर यांचे दणदणीत कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे याबरोबरच दिनांक 23 डिसेंबर रोजी संगीतमय रामायण,सुंदर कांड पाठ रात्री आठ ते सकाळी पाच वाजेपर्यंत होणार आहे या ठिकाणी मृदंगाचार्य म्हणून सचिन महाराज हे सेवा देणारा असून दुपारी बारा वाजता दहीहंडीचा कार्यक्रम व महाआरती होणार आहे तसेच देव दिवाळी व प्रथम वर्षाचे १३ डिसेंबर पासून तर 31 डिसेंबर पर्यंत या ठिकाणी यात्रा उत्सवाचे ही आयोजन करण्यात आलेले आहे तरी या कार्यक्रमाला जळगाव जिल्ह्यातील परिसरातील सर्व भाविक भक्त नागरिक यांनी गुरु आणि गोविंदांच्या ऐतिहासिक अभू तपूर्व सोहळ्याचे साक्षीदार  व्हावे आणि महा प्रसादाचा लाभ घ्यावा असे आदेश बाबा,संपूर्ण ग्रामस्थ व भाविक भक्त यांनी निमंत्रित केले आहे

No comments