नांद्रा येथे दिनांक 14 डिसेंबर पासून श्री नवनाथ महाराज मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा प्रारंभ
नांद्रा येथे दिनांक 14 डिसेंबर पासून श्री नवनाथ महाराज मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा प्रारंभ नांद्रा ता. पाचोरा (वार्ताहर)- प्रा. यशवंत पवार नांद्रा येथे नवे गावात पारंपारिक जुने असणारे नवनाथ महाराज मंदिराचा प्राणप्रतिष्ठान सोहळा दिनांक 15 डिसेंबर वार शुक्रवार रोजी सकाळी 8. वा वाजेपासून मूर्ती अभिषेक व प्रांत प्रतिष्ठान सोहळा आचार्य श्री भालचंद्र लक्ष्मणराव पिंपळे वेरूळीकर महाराज यांच्या मंत्रोच्चाराने संपन्न होणार आहे दिनांक 14 डिसेंबर वार गुरुवार रोजी सकाळी 8 ते 12वा. पर्यंत मूर्तीची मिरवणूक सोहळा याबरोबरच गुरुवार रात्री 9 वाजता कीर्तनाचा कार्यक्रम कीर्तनकार ह भ प प्रतिभाताई महाराज जवखेडेकर येथील व दिनांक 15 डिसेंबर वार शुक्रवार रोजी 9.वाजता कीर्तनाचा कार्यक्रम हभप विठ्ठल महाराज आडगावकर यांच्या सुंदर वाणी मधून होणार आहे या पुजारी महाराज म्हणून सेवा देणारी श्री नवनाथ महाराज मंदिर देवस्थान नांद्रा येथील येथील ग. भा. लह्याबाई मन्साराम पाटील व अनमोल सहकार्य म्हणून मित्रमंडळी परिवार सुरत नातेवाईक परिवार समस्त ग्रामस्थ परिवार व बोरसे परिवार नंदकिशोर बोरसे यांचे सहकार्य लाभत आहे कार्यक्रमाला महादेव महाराज भजनी मंडळ टाळ मृदुंग विना चा साथ देणार आहेत तसेच दिनांक 16 डिसेंबर रोजी शनिवार सकाळी 8 वाजता महा आरती, महापूजा व 11 वाजेपासून महाप्रसाद कार्यक्रम होणार आहे रात्री 9 वाजता महादेव महाराज भजनी मंडळ यांचा अभंग गवळण व भारुडाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तरी कार्यक्रमाचा लाभ जास्तीत जास्त भाविक भक्त यांनी घेण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आलेले आहे

No comments