नांद्रा - शेती झाली नष्ट,लक्ष्मी पावण्यासाठी, लक्ष्मीचीच निर्मिती करून सोनवणे परिवाराने निवडला आत्मनिर्भर होण्याचा मार्ग.
नांद्रा ता. पाचोरा प्रतिनिधी
(*प्रा. यशवंत पवार*)
यावर्षी सलग पावसाने संपूर्ण महाराष्ट्र झोडपून काढला असून अतिवृष्टीमुळे संपूर्ण हाता तोंडाशी आलेले सर्व पिके नेस्त नाबूत झाली त्यामुळेच नांद्रा येथीलही सलून व्यवसाय करणारे नंदलाल सोनवणे व त्यांची पत्नी सौ संगीता नंदलाल सोनवणे यांनीही आपल्या कुरंगी शिवारात असलेल्या शेतात बाजरी पीक टाकली होती परंतु तेही संपूर्ण अतिवृष्टीमुळे पूर्णतः सडून गेले व टाकलेला खर्चही निघला नाही सोनवणे परिवार हा एका पत्राच्या घरात राहत असून त्यांना आता पुढे काय? शेतीच्या तुकड्यावर आपला उदरनिर्वाह दोन मुलं व एक मुलींचं शिक्षणाचा खर्च कसा करावा अशा समस्या त्यांच्या डोळ्यासमोर भेडसावत असताना त्यांनीया आसमानी व सुलतानी संकटांच्या समोर दोन हात करण्याचे ठरवून हार न मानता अजून उचल चे पैसे घेऊन या दोघं दाम्पत्यांनी लक्ष्मीची मूर्ती,लक्ष्मीचे पाऊले, कलश, पादुका,घट,घट्या व इतर लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लागणार मातीचे भांड्यांचे साहित्य असे शाडू मातीचे अशा सुंदर सुबक साचेबंद मूर्ती बनवणे आपल्या छोट्या घरी सुरू करून गृह उद्योग सुरू केला आहे दिवाळीच्या अगोदर आपल्या छोट्याशा घरात लघुउद्योग सुरू केला आहे त्यांना दोघं मुले मुलीही साथ देत आहेत त्यामुळे त्यांनी या आपल्या शेती व्यवसायाच्या पारंपारिक व्यवसायाला जोड लघुउद्योग म्हणून हा मूर्ती बनवण्याचा व्यवसाय अंगीकारल्याने त्यांना आत्मनिर्भर होण्याची प्रेरणा मिळाली त्यामुळेच आज त्यांच्या मुलांचे शिक्षण,शेतीला लागलेला खर्च,त्यांच्या रोजी रोटीचे व उदरनिर्वाचे साधन म्हणून एक नवीन मार्ग सापडला असून भविष्यातही ते याच पद्धतीने इतर लघुउद्योग करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला व छोट्या स्वरूपात का असेना लक्ष्मी देवी त्यांना पावेन व दिवाळीपूर्वीच या मूर्ती विकून दोन पैसे त्यांना मिळतील व पूर्णतः शेतीवरच अवलंबून न राहता त्यांनी आत्मनिर्भर होऊन त्यांची ही दिवाळी या व्यवसायापासून गोड होईल अशी आशा गृहिणी व या मूर्तीच्या निर्मात्या सौ संगीता नंदलाल सोनवणे यांनी प्रस्तुत पद्धतीशी बोलताना सांगितले
नांद्रा - शेती झाली नष्ट,लक्ष्मी पावण्यासाठी, लक्ष्मीचीच निर्मिती करून सोनवणे परिवाराने निवडला आत्मनिर्भर होण्याचा मार्ग.
Reviewed by Creative News
on
October 03, 2025
Rating: 5
No comments