Breaking News

नांद्रा येथे उद्या कृषी सम्राट ऍग्रो फार्मर प्रोडूसर कंपनी लिमिटेड अंतर्गत कृषी सम्राट मॉल व ड्रोन द्वारे फवारणीचं भव्य उद्घाटन समारंभ व भव्य आरोग्य तपासणी शिबीर


नांद्रा येथे उद्या कृषी सम्राट ऍग्रो फार्मर प्रोडूसर कंपनी लिमिटेड अंतर्गत कृषी सम्राट मॉल व ड्रोन द्वारे फवारणीचं भव्य उद्घाटन समारंभ व भव्य आरोग्य तपासणी शिबीर 

नांद्रा ता. पाचोरा (प्रतिनिधी )

प्रा.यशवंत पवार 

येथे दिनांक 28 सप्टेंबर वार रविवार रोजी सकाळी 10 वाजता लक्ष्मी ऍग्रो केमिकल ,तुळजाभवानी मंदिर शेजारी कृषी सम्राट मॉल व डोन द्वारे फवारणीचे उद्घाटन संपन्न होणार आहे तसेच भाविकांचे प्रती तुळजापूर असणाऱ्या भवानी मातेचे श्रद्धास्थान असणाऱ्या तुळजाभवानी मंदिर या ठिकाणी भव्य असे आरोग्य तपासणी शिबीरही ठेवण्यात आलेले आहे त्यामध्ये नेत्र तपासणी, दंत तपासणी,अस्थिरोग,जनरल आजार यावर तपासणी होणार आहेत याबरोबरच कृषी सम्राट मॉलच्या उद्घाटनाप्रसंगी ड्रोनद्वारे फवारणीचे प्रात्यक्षिकसकाळी 10 वा दाखवून विविध प्रकारचे दर्जेदार कीटकनाशके स्वस्त दरात मिळण्यासाठी हा कृषी सम्राट ऍग्रो फार्मर प्रोडूसर कंपनी लिमिटेड कृषी मॉलचे उद्घाटन होत असल्याचे संचालक नानासाहेब सूर्यवंशी यांनी सांगितले याप्रसंगी या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन जलसंपदा आपत्ती व्यवस्थापन मंत्री महाराष्ट्र राज्य तसेच प्रमुख पाहुणे मध्ये खासदार स्मिताताई वाघ जळगाव,आमदार राजू मामा भोळे, पाचोरा भडगाव आमदार किशोरआप्पा पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर,जिल्हा कृषी अधिकारी कुर्बानजी तडवी, उपविभागीय कृषी अधिकारी किशोरजी मांडगे,जिल्हा कृषी विकास अधिकारी पद्माकर जी मस्के, जिल्हा गुण नियंत्रण अधिकारी विकासजी बोरसे,माजी आमदार दिलीप वाघ, अमोल भाऊ शिंदे,निर्मल सीडस संचालिका सौ वैशालीताई पाटील, निवृत्त कृषी अधिकारी जीवराजजी आमले,कृषी भूषण शेतकरी लोहारा विश्वासरावजी पाटील, कृषी भूषण शेतकरी जळके राजेश दादा पाटील, नांद्रा सरपंच ताई कल्पना सुभाष तावडे अशा मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार आहे तरी कार्यक्रमाला सर्व शेतकरी बांधवांनी उपस्थिती द्यावी विशेष सहकार्य म्हणून संत बाबा गुरुदास राम चॅरिटेबल ट्रस्ट नेत्रज्योती हॉस्पिटल जळगाव यांचं सहकार्य लाभणार आहे तरी गरजू रुग्णांनी या शिबिरांचे फायदा घ्यावा असे आवाहन लक्ष्मी अग्रो संचालक डॉ. दीपक पाटील,बाळासाहेब सूर्यवंशी व नानासाहेब सूर्यवंशी संचालक यांनी केले आहे



No comments