Breaking News

नांद्रा येथे अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहास आजपासून प्रारंभ


नांद्रा येथे अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहास आजपासून प्रारंभ

नांद्रा ता. पाचोरा( प्रतिनिधी) 

प्रा. यशवंत पवार

येथे सालाबादप्रमाणे पिठोरी अमावस्या म्हणजेच पोळ्याच्या दिवशी दिनांक 22 ऑगस्ट रोजी श्रावण समाप्तीनंतर अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह प्रारंभ झाला आहे महादेव मंदिर संस्थान आयोजित या प्राचीन ऐतिहासिक दीडशे वर्षाची परंपरा असणाऱ्या द्वीपिंडी महादेव मंदिर मध्ये भाविकांच्या मनातील सुप्त इच्छा पूर्णत्वास येत असल्याने या ठिकाणी गावातील व्यक्ती बाहेर गावाला कुठेही असला तरी तो सप्ताच्या काकडा आरतीला व महाप्रसादाला दर्शनाला सहकुटुंब सहपरिवार हजर होत असतो 

यावर्षीची सप्ताह पूजाअर्चा सेवा माजी मेजर, सुभेदार,ऑडनरी कॅप्टन ह भ प नानासाहेब दशरथ तावडे यांना मिळाली सालाबादाप्रमाणे महाराष्ट्रातील नामवंत हरिभक्त परायण कीर्तनकार महाराज या ठिकाणी आपली सेवा देण्यासाठी येत असतात यामध्ये दिनांक 22 ऑगस्ट रोजी ह भ प जितेंद्र महाराज म्हसावद,दिनांक 23 ऑगस्ट रोजी ह भ प स्नेहलता ताई पाटील सामनेरकर,दिनांक 24 ऑगस्ट रोजी ह भ प भागवत महाराज जळगावकर,दिनांक 25 ऑगस्ट रोजी ह भ प सावता महाराज मोहाडीकर,दिनांक 26 ऑगस्ट रोजी ह भ प भगवान महाराज आसन खेडेकर,दिनांक 27 ऑगस्ट रोजी ह भ प कैलास महाराज कुरंगीकर,दिनांक 28 ऑगस्ट रोजी ह भ प लीलाधर महाराज ओझरकर, दिनांक 29 ऑगस्ट रोजी सुनील महाराज कर्क्की ता.मुक्ताईनगरकर यांचं काल्याचे किर्तन संपन्न होणार आहे दिनांक 29 ऑगस्ट रोजी सकाळी 5 वाजता महाकाकडा आरती व सकाळी 9.वाजता हरि भक्त परायण तसेच सायंकाळी 5. वा. दिंडी पालखी सोहळा व रात्री नऊ वाजेपासून भारुड गवळणींचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे मंदिरावर तसेच गाव द्वार,शिवस्मारक व संपूर्ण ग्रामदैवत यांच्यावर आकर्षक रोषणाईने मंदिरही आता सज्ज झालेले आहेत तरी या कार्यक्रमाचे संयोजक म्हणून ह भ प कैलास महाराज कुरंगीकर व महादेव भजनी मंडळ नांद्रा तरी या सप्ताह जास्तीत जास्त परिसरातील भाविक भक्तांनी लाभ घेण्याचे आयोजन महादेव मंदिर संस्थान नांद्रा अध्यक्ष सुभाष त्रंबक बाविस्कर सचिव बापू सर सूर्यवंशी व सर्व सन्माननीय सदस्य व ग्रामस्थ व महादेव भजनी मंडळ नांद्रा यांनी केले आहे

No comments