नांद्रा बँक ऑफ बडोदा शाखेत पुन्हा पैसे अभावी ग्राहक संतप्त
-ग्राहकांनी वाचला समस्यांचा पाढा
नांद्रा ता. पाचोरा प्रतिनिधी
(प्रा.यशवंत पवार)
येथील राष्ट्रीयकृत बँक ऑफ बडोदा येथे नेहमीच पैशांची चुनचुन भासत असते सुमारे सहा ते सात गावांचा संपर्कात असणारे व सर्वात जास्त ग्रामीण भागातील कृषी कर्ज खाते, बचत गट खाते, संजय निराधार पगार खाते,व इतर अनेक बचत खाते यांचे आर्थिक देवाण-घेवांच मध्यवर्ती ठिकाण म्हणून नांद्रा या ठिकाणी आर्थिक उलाढाल बँक ऑफ बडोदा या शाखेमार्फत होत असते परंतु गेल्या मागील काही वर्षापासून या बँकेच्या मागे लागलेली घरघर काही कमी होताना दिसत नाही आहे कारण या बँकेत कॅश ही दोन ते अडीच वाजता येते व बँकेत गेल्या चार दिवसापासून तर हद्दच झाली अवघ्या 1000 पासून तर 25000 पर्यंत कॅश काढण्यासाठी शेतकरी ग्राहक आत्माराम सिताराम पाटील नांद्रा, आसन खेड्याचे नाना पाटील व इतर शेतकरी ग्राहक असे एक ना अनेक ग्राहक चार दिवसापासून एन पोळ्याच्या सणाच्या पूर्वी बाजाराची खरेदी करण्यासाठी पैसे काढण्यासाठी ची लगबगी साठी शेतातले कामे सोडून बँक ऑफ बडोदा नांद्रा शाखेत आपल्या चपला झिजवत आहेत याप्रसंगी सर्व ग्राहकांनी संतप्त अशा प्रतिक्रिया देऊन पुढे या बँकेत खाते ठेवायचे का नाही हा उद्विग्न सवालच विचारला असून यावेळी शाखा व्यवस्थापक यांनी या समस्यांचे निराकरण करण्यासाठी वरिष्ठ नोडल ऑफिसला कळवून त्यांच्या मार्गदर्शनाने कॅश लवकरात लवकर कशी आणता येईल याबाबत प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले यावेळी माजी सरपंच तथा शिवसेना तालुकाप्रमुख विनोद तावडे, उपसरपंच शिवाजी तावडे, तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष बाविस्कर,सामाजिक कार्यकर्ते विनोद आप्पा बाविस्कर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोपान पाटील,शेतकरी ग्राहक आत्माराम सिताराम बोरसे, पिंटू बोरसे,संदीप खैरनार,नाना पाटील,गुलाब बाविस्कर, बंटी सूर्यवंशी, संजू पाहुणे,संजय रामदास बाविस्कर, पत्रकार प्रा. यशवंत पवार सह खेडोपाडी वरती अनेक महिला व पुरुष ग्राहक पैसे काढण्यासाठी उपस्थित होते
नांद्रा बँक ऑफ बडोदा शाखेत पुन्हा पैसे अभावी ग्राहक संतप्त
Reviewed by Creative News
on
August 20, 2025
Rating: 5
No comments