क्रिएटिव्ह इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये अक्षर दिंडी, वृक्षदिंडी व वारकरी दिंडी उत्साहात संपन्न
नांद्रा, ता. पाचोरा (प्रतिनिधी):
(प्रा. यशवंत पवार)
क्रिएटिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल, नांद्रा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीचे औचित्य साधून अक्षर दिंडी, वृक्षदिंडी आणि वारकरी दिंडी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या समृद्ध वारकरी परंपरेची ओळख करून देतानाच अक्षरज्ञान, साक्षरतेचे महत्त्व, वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाची जाणीव व्हावी या उद्देशाने या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा परिधान करून विठ्ठल-रुक्मिणी यांच्या भूमिका अतिशय सुंदररीत्या साकारल्या. पालखीत वृक्षांची रोपे आणि पुस्तके ठेवण्यात आली होती. तसेच विद्यार्थ्यांच्या हातात मराठी मुळाक्षरे, इंग्रजी अक्षरे, अंक आणि विविध वृक्षांची रोपे असल्यामुळे ही दिंडी सर्वांचे विशेष आकर्षण ठरली. परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले.दिंडीपूर्वी पालखीचे पूजन प्रा. यशवंत पवार व सौ. नम्रता पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर लेझीमच्या ठेक्यावर, टाळ-मृदंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात संपूर्ण शाळा परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला.यावेळी विद्यार्थ्यांनी "अक्षर कळे, संकट टळे", "ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा", "ज्ञान पंढरीचे आम्ही वारकरी", "साक्षर भारत – अखंड भारत", "भारत माता की जय" अशा घोषणांनी परिसर भारावून टाकला. या घोषणांमधून साक्षरता, संस्कार आणि पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नम्रता पवार, शीतल पाटील, पूनम पाटील, शालिनी भोई, ममता महाले, प्रतीक्षा शिनकर, पूजा सूर्यवंशी आणि रोशनी पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक परंपरेबरोबरच शिक्षण, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जाणीव यांचे महत्त्व प्रभावीपणे रुजविण्यात यश आले.
क्रिएटिव्ह इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये अक्षर दिंडी, वृक्षदिंडी व वारकरी दिंडी उत्साहात संपन्न
Reviewed by Creative News
on
July 24, 2026
Rating: 5
No comments