नांद्रा येथील बहूळेश्वर रस्त्यालगत लिंबाच्या झाडावर वीज कोसळली
*नांद्रा येथील गावालगत गाव नाल्या जवळील निंबाच्या झाडावर वीज कोसळली* पाचोरा प्रतिनिधी✍️ (प्रा यशवंत पवार )
नांद्रा येथून बहूळेश्वर कडे जाणारा क्षेत्र रस्ता लगत सांडपाण्याच्या नाल्याजवळ साहेबराव ज्योतीराम सूर्यवंशी यांच्या शेताजवळ असलेल्या लिंबाच्या अर्धवट ओल्या व सुकलेल्या झाडावर काल दिनांक 10 सप्टेंबर रोजी मध्यरात्री विज कोसळल्याने ते झाड अक्षरशा अजूनही दुसऱ्या दिवसापर्यंत पेट घेत आहे व त्यातील ज्वाला अजूनही धगधगत आहेत त्यामुळे पाहणाऱ्यांची एकच गर्दी उडालेली आहे यावर्षी अजून पाहिजे तसा समाधानकारक पाऊस नांद्रा परिसरात पडलेला नाही त्यामुळेच काही शेतकऱ्यांनी शेती सिंचनाला विहिरींवरून मोटारी सुरू केले आहेत त्यासाठी ते रात्र अपरात्री शेतात सिंचनाला ही जातात परंतु गेल्या दोन दिवसापासून विजांच्या कडकडाट व ढगांचा गडगडाट सह दररोज मध्ये रात्री मुसळधार पाऊस कोसळेल अशी परिस्थिती नांद्रा परिसरात असते परंतु विजांच्या कडाडल्याने विज जवळच कुठेतरी पडल्याची धास्ती मनात प्रत्येकाचा येत असते असते याच प्रकारे गावापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गाव ना ल्याच्या बाजूला बहू ळेश्वर रस्ता या ठिकाणी रस्त्यावर लागत असलेला निंबाच्या झाडावर ही वीज कोसळली. अपघात जर दिवसा झाला असता तर बैलगाडी चालक,गुरेढोरे, पशुपालक, शेतात जाणारे शेतकरी वर्ग यांच्यावर मोठी दुर्घटना होऊ शकली असती परंतु रात्रीच्या समयी वीज पडल्याने पुढील मोठा अनर्थ टळला तरी अजूनही उन्हाची तीव्रता कायम असून सर्व सजीवांची लाही लाही होत असून नांद्रा परिसरात दमदार पावसाची प्रतीक्षा अजूनही आहे


No comments