नांद्रा परिसरात मागील वर्षाच्या झालेल्या रब्बीच्या वादळी वाऱ्यांच्यामूळे पिकांच्या नुकसानीच्या भरपाईच्या प्रतीक्षेत शेतकरी वर्ग
नांद्रा परिसरात मागील वर्षाच्या रब्बीच्या वादळीवाऱ्यांच्या पिकांचे नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत अजूनही शेतकरी वर्ग पाचोरा प्रतिनिधी ✍️( प्रा यशवंत पवार) मागच्या वर्षी रब्बी हंगामाच्या वेळेस बे मोसमी पाऊस वारा वादळ जोरात होऊन नांद्रा सह परिसरात दादर,मक्का, कपास अशा मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान होऊन तातडीने पंचनामे झाले होते परंतु अजूनही त्या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना अजून झालेल्या पंचनामांचे नुकसान भरपाई मिळाले नसून आता नुकताच शासनाने 3100 कोटी रुपये खरीपासाठी नुकसानग्रस्त भागात जाहीर केले असून मागच्या वर्षीही रब्बी मध्ये नुकसान ग्रस्त शेतकरी यांनीही योग्य ते कागदपत्र व पंचनामे करून प्रकरण दाखल केलेले आहेत तरी शासनाने योग्य ते पंचनामेनुसार नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देऊन न्याय द्यावा अशी अपेक्षा नुकसान ग्रस्त शेतकरी वर्गाकडून होत आहे



No comments