Breaking News

नांद्रा येथे पशुवैद्यकीय दवाखान्यात लम्पि लसीकरणास सुरुवात

 


नांद्रा येथे गुरांच्या लम्पी लसीकरणाला सुरवात.                                     पाचोरा (प्रतिनिधी)- प्रा. यशवंत पवार     पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती पाचोरा  पशुवैद्यकीय दवाखाना नांद्रा व ग्रामपंचायत नांद्रा यांचे सौजन्याने गावातील पशुधनांना लम्पी स्क्रीन आजाराच्या पार्श्वभूमीवर लशीकरण आणि गोठे व गोचीड, गोमाशा प्रतिबंध औषधी देण्यात आली.या वेळी नांद्रा ग्रामपंचायत मार्फत 400गुरांना लम्पी लस उपलब्ध करून देण्यात आली आहे.नांद्रा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ निलेश बारी यांच्या सह मधुकर लोखंडे,अरविंद पाटील ,भूषण पाटील ,सचिन डाभंरे 

 सरपंच विनोद तावडे उपसरपंच शिवाजी तावडे, ग्रामपंचायत सदस्य किशोर पाटील सर्व ग्राम सदस्य व ग्रामस्थ शेतकरी वर्गाचे सहकार्य लाभत आहे.शेतकर्यांनी अरविंद कंपाऊंडर यांच्या शी  संपर्क साधावा.मो.न.9503546899                                 असे आवाहन पशुवैद्यकीय दवाखान्यात करण्यात आलेले आहे

No comments