नांद्रा येथील शिवस्मारकाला उद्या भेट देणार मा.उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार
नांद्रा येथील प्रेरणा स्रोत असलेले शिवस्मारकाचा आशीर्वाद घेणार माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार पाचोरा प्रतिनिधी ( प्रा यशवंत पवार✍️ ) नांद्रा पाचोरा येथील तरुणांचे व शिवप्रेमींचे व संपूर्ण देशाचे दैवत असणारे जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज,राष्ट्रमाता वीरमाता जिजामाता यांच्या प्रतिमा एकाच ठिकाणी उभारण्यात आलेल्या शिवस्मारकाचा आशीर्वाद घेण्यासाठी महाराष्ट्रातील राजकीय,सामाजिक सांस्कृतिक,क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व आशीर्वाद घेऊन भेट देऊन मगच पुढे मार्गस्थ होत असतात याच्या अगोदरही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब,मा.पर्यटन मंत्री आदित्यजी ठाकरे,आदर्श गाव पाटोदा निर्माते आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील भेटी दिल्या आहेत आता दिनांक 15 सप्टेंबर रोजी पाचोरा येथे राष्ट्रवादीच्या महामेळावा निमित्त येणारे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे स्पष्ट वक्ते व फायरब्रॅंड नेते महाराष्ट्र राज्याचे मा.उपमुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार हेही नांद्रा येथील शिवस्मारकालाही दुपारी 2. वा आशीर्वाद घेऊन भेट देणार आहेत तरी या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विधानसभा क्षेत्र प्रमुख व माजी सभापती नितीन दादा तावडे यांनी गटातील जास्तीत जास्त कार्यकर्ते,सरपंच कमिटी व ग्रामस्थ यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे याप्रसंगी प्रत्येक मान्यवराला शिवस्मारक ग्रुप कडून शिवस्मारक फोटो भेट म्हणून देण्यात येतो

.jpg)
No comments