नांद्रा येथे सौ.वैशालीताई सुर्यवंशी यांच्या तर्फे छ. शिवाजी महाराज जयंती निमित्ताने विनामूल्य मोतीबिंदू शिबीरात 321 रुग्णांच्या तपासण्या संपन्न
*नांद्रा येथे सौ.वैशालीताई सुर्यवंशी यांच्या तर्फे छ. शिवाजी महाराज जयंती निमित्ताने विनामूल्य मोतीबिंदू शिबीरात 321 रुग्णांच्या तपासण्या,71 रुग्णांचे होणार ऑपरेशन नांद्रा ता. पाचोरा (प्रतिनिधी ) (प्रा. यशवंत पवार)*
नांद्रा येथे तिथीनुसार साजरी झालेली शिवजयंती निमित्त सौ वैशालीताई सूर्यवंशी यांनी पाचोरा भडगावातील सर्व गटात मोफत मोतीबिंदू शिबीर राबवून 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण करणार असल्याच्या आपल्या मनोगतातून सांगून तुमची मुलगी म्हणून मी माझं कर्तव्य संपूर्ण तालुका मोतीबिंदू विरहित करण्याचा चंग बांधला असल्याचे सांगून त्याच अनुषंगाने या सामाजिक उपक्रमाचा शेवटचा गट म्हणून कुरंगी बांबरुड गटातील मोतीबिंदू असलेल्या रुग्णांसाठी मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. यशवंत पवार यांनी केले तर प्रास्ताविक जिल्हा उपसंघटक विनोद आप्पा बाविस्कर यांनी केले यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक रमेश जी बाफना यांनीही आपल्या जीवनातील डोळे किती महत्त्वाचे आहेत याविषयी उदाहरणार्थ मार्गदर्शन केले
याप्रसंगी शिबिराचे उद्घाटन सौ.वैशालीताई सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कांताई नेत्र हॉस्पिटल जळगाव चे डॉक्टर वैभव शिंदे व डॉक्टर विनोद पाटील यांनी रुग्णांची तपासणी केली यामध्ये एकूण 321 रुग्णांच्या तपासण्या झाल्या त्यानंतर 71 रुग्ण यांच्या संपूर्ण मोफत विनामूल्य मोतीबिंदूचे ऑपरेशन टीका परिपक्व असल्याने त्यांना पुढील ऑपरेशन साठी जळगाव ला घेऊन जाण्यात येणार आहे त्यासाठी येण्या जाण्यासाठी राहण्याची व जेवणाची व संपूर्ण औषध उपचाराचा खर्च,चष्मा,हा सर्व खर्च
वैशालीताई सूर्यवंशी यांच्याकडून करण्यात येणार आहे यावेळी तालुका प्रमुख शरद पाटील, रमेश जी बाफना, विनोद बाविस्कर, प्रविण पाटील, विनोद तावडे,किरण तावडे,राजु भैय्या, प्रकाश पाटील, विनोद पाटील सखाराम तुकाराम पाटील, कैलास पाटील,सुभाष त्रंबक बाविस्कर, बालू बाविस्कर, पिंपळे गुरुजी, पत्रकार राजेंद्र पाटील,पत्रकार प्रा. यशवंत पवार यांच्या सह परीसरातील कुरंगी माहिजी,वरसाडे,सामनेर,बांबरुड,लासगाव,वडगाव,दुसखेडे, पहान,हडसण,खेडगाव, वेरूळी,
गोराडखेडा, यासह एकूण 321 रूग्न महिला व पुरुष यांनी शिबीरात डोळे तपासून ,शिबीरात सहभाग नोंदवला तर 71 रुग्णांना पुढील शस्त्रक्रियेसाठी जळगावला रवाना करण्यात येणार आहे




No comments