नांद्रा येथे शिवजयंती निमित्त महालक्ष्मी दुर्गा मंडळ तर्फे शिवगर्जना नाटिका
नांद्रा येथे शिवजयंती निमित्त महालक्ष्मी दुर्गा मंडळ तर्फे शिवगर्जना नाटिका नांद्रा ता. पाचोरा ( प्रा. यशवंत पवार)- येथे महालक्ष्मी दुर्गा मंडळ कायम गावातील सामाजिक, धार्मिक, सांप्रदायिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रमात सुमारे 50 तरुणांचा समूह असलेला विधायक ग्रुप आहे यामध्ये मोल मजुरी करणारे तरुण,उद्योग व्यवसाय करणारे तरुण,नोकरी व्यवसाय करणारे तरुण, शेतकरी तरुण, असा हा विधायक ग्रुप गेल्या 15 वर्षापासून नांदऱ्यात आपली एक सामाजिक उत्तरदायित्व निभावत आहे याच अनुषंगाने आपल्या महाराष्ट्राचं तुमचं आमचं सर्वांचं दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजयंती महोत्सव प्रसंगी दिनांक 18 फेब्रुवारी वार रविवार रोजी सायंकाळी 7 वा.जि. प.शाळेमध्ये साई गजर मंडळ जळगाव,नंदुरबार या ग्रुप तर्फे शिवगर्जना नाटकाचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आलेला आहे तरी परिसरातील सर्व शिवभक्तांनी व ग्रामस्थ, माता-भगिनींनी, बाल वृद्ध यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री महालक्ष्मी दुर्गा मंडळाच्या सर्व मित्रमंडळी तर्फे आयोजकांकडून करण्यात आलेले आहे

No comments