Breaking News

नांद्रा येथे अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहासं प्रारंभ - आकर्षक रोषणाईने सजले ग्रामदैवत


नांद्रा येथे अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहासं प्रारंभ - आकर्षक रोषणाईने सजले ग्रामदैवत 
                           (प्रा यशवंत पवार ✍🏻)                  नांद्रा ता. पाचोरा (प्रतिनिधी )-        येथे सालाबादप्रमाणे द्विपिंड महादेव महाराज यांच्या कृपेने व श्रद्धेय कल्याण दाजी महाराज व 1008 श्री प. पू.विष्णुदासजी स्वामी यांच्या आशीर्वादाने व ग्रामस्थ मंडळी यांच्या सहकार्याने दिनांक 2 सप्टेंबर वार सोमवार पोळ्याच्या दिवशी पासून अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह प्रारंभ झाला याप्रसंगी संपूर्ण गावाचे ग्राम दैवत असलेले महादेव मंदिर,गणपती मंदिर, बजरंग मंदिर,मरी आई माता मंदिर, शिवस्मारक,गाव द्वार यावर आकर्षक डिजिटल लाइटिंग रोषणाई करण्यात आले असल्यामुळे यावर्षी वेगळं आकर्षण सप्ताह मध्ये निर्माण झाले आहे महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार महाराज यांनी ज्ञानदानातून भाविक भक्तांना कीर्तनरुपी सेवा देत आहेत यामध्ये ह भ प पांडुरंग महाराज, ह भ प सौरभ महाराज, ह भ प गजानन महाराज, ह भ प योगेश महाराज,ह भ प निलेश महाराज,ह भ प योगेश महाराज,ह भ प सुनीता ताई महाराज,ह भ प दीनानाथ महाराज असे किर्तन रुपी सेवा रात्री 8 ते 10 वाजे दरम्यान घडत आहे सप्ताह ची सांगता, दिनांक 9 सप्टेंबर वार सोमवार

रोजी सकाळी भव्य दिव्य 5 वाजता काकड आरती सोहळा व सकाळी 9 ते 12 काल्याचे किर्तन व दुपारी 12 ते 5 महाप्रसाद व रात्री नऊ वाजेपासून भारुड गवळणी यांचा कार्यक्रम आयोजन तरी या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त भाविक भक्तांनी लाभ घेण्याचं आवाहन आयोजक व संयोजक श्री महादेव महाराज संस्थान नांद्रा समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ यांनी केले आहे

No comments