Breaking News

नांद्रा बँक ऑफ बडोदा शाखेचा अजब कारभार, कृषी कर्ज दंडाची रक्कम वसुलीसाठी येतो मेसेज व फोन परंतु अगोदरच थकू नये कर्ज या साठी एसएमएस चार्ज भरूनही येत नाही रिमाइंडर एसएमएस.

नांद्रा बँक ऑफ बडोदा शाखेचा अजब कारभार, कृषी कर्ज दंडाची रक्कम वसुलीसाठी येतो मेसेज व फोन परंतु अगोदरच थकू नये कर्ज या साठी  एसएमएस चार्ज भरूनही येत नाही रिमाइंडर एसएमएस.                   नांद्रा ता.पाचोरा (प्रतिनिधी) -           (प्रा. यशवंत पवार ) -                   नांद्रा येथे बँक ऑफ बडोदा शाखा कायम काही ना काही कारणास्तव नेहमी चर्चेत असतेच मागेही उशिरा कॅश येत असल्यामुळे पगारदार, शेतकरी व वैयक्तिक लाभाचे पगारी असणारे वृद्ध व्यक्ती खातेदार यांना दुपारी दोन दोन तीन वाजेपर्यंत बसून मनस्ताप करायची पाळी यायची तर आता मात्र शेतकऱ्यांनी घेतलेले पीक कर्ज वेळीच भरण्यासाठी बँकेचे एसएमएस शुल्क कपात होऊन ही शेतकऱ्यांना जनजागृती म्हणून अगोदर एसएमएस व फोनही न येता मात्र पीक कर्जाची तारीख गेल्यावर दोन-चार दिवसातच आपला थकीत रकमेचा व्याज असलेला एसएमएस मात्र येतो म्हणूनच शेतकरी वर्गाला याचा नाहकच आर्थिक भुर्दंड व्याज रुपयेने बसत असून व कर्ज थकवल्यामुळे रिबीट ही भेटत      नसल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये प्रचंड नाराजी व संताप व्यक्त होत आहे, शेतकऱ्यांनी या संबंधात पीक कर्ज तारीख येण्याअगोदरच एसएमएस अलर्ट शेतकऱ्यांना गेला पाहिजे किंवा भ्रमणध्वरीद्वारे फोन कंपनीचा गेला पाहिजे अशी मागणी होत आहे त्यामुळे नियमित पीक कर्ज भरणारे शेतकरी यांनाही  कर्ज घेतल्याची दिनांक लक्षात न राहिल्याने  दोन चार दिवस वर गेल्यामुळे नाहकच व्याजापोटी आर्थिक भुर्दंड बसत असून त्यामुळे रिबीटी ही मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप व नाराजी व्यक्त होत आहे तरी मोबाईल एसेमेस सेवा अगोदरच सर्व खात्यांना लिंक करून प्रत्येक पीक कर्जाची माहिती देण्यात येण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे

No comments