Breaking News

कष्टकरी बापांचे स्वप्न साकारले,नांद्रा चे सैन्य दलात दोन तरुण भरती झाले नां


कष्टकरी बापांचे  स्वप्न साकारले,नांद्रा चे सैन्य दलात दोन तरुण भरती झाले
                    नांद्रा  पाचोरा                        (प्रतिनिधी प्रा.यशवंत पवार )        येथील स्वातंत्र्य सैनिकाचा वारसा असणाऱ्या या गावात सैन्य दलाची परंपरा ही एका घरा आड तिन्ही दलात भरती असणारे एक तरुण असणे आत्ता नवीन नाही परंतु  आज बिकट परिस्थितीमध्ये कष्ट करून, मोलमजुरी करून मिळेल ते काम करून सकाळी सूर्योदयापासून तर सूर्यास्त पर्यंत कष्ट करणारे बाप  संजू भाऊ सोनार व संतोष भाऊ बाविस्कर यांचे मुलं हर्षल संजय सोनार व विनायक संतोष बाविस्कर हे नुकत्याच झालेल्या  सैन्य दलातील   भरती मध्ये आर्मीत भरती झाल्यामुळे निश्चितच या बापाचे कष्ट साकार झाल्याने त्यांनी गावभर पेढे वाटप तर केलेच शिवाय इतर भरती होऊ घातलेल्या तरुणांना ही एक आदर्श दिला, तसेच तरुणांनी  या दोघे तरुणांना डोक्यावर घेऊन गाव भर मिरवणूकही काढली, या आनंददायी क्षण पाहून बघीतांच्या डोळ्यात

आनंदाश्रू वाहत होते व असे परिसरात अजून बरेच तरुण ही सैन्य दलात भरती होण्यासाठी खडतर परिस्थितीशी स्वतः मिळेल ते काम करून मजुरी करून भरतीसाठी   अभ्यासासाठी पुस्तकांसाठी ते व त्यांचे कुटुंबातील आई-वडील कष्ट करून परिस्थितीशी दोन हात करून  आपला मुलगा निश्चित भरती होणार याचे स्वप्न उराशी बाळगून आहेत ,येणाऱ्या सैन्य दलातील तिन्ही भरतीमध्ये भविष्यात परिसरातील तरुणांची स्वप्न निश्चित साकार होईल अशी सदिच्छा सर्व मातृभूमी रक्षणार्थ असणारे आजी-माजी सैनिक व ग्रामस्थ यांच्याकडून होत आहे

No comments