लांडगा आला रे., लांडगा आला.., धनगरा सांभाळा आपल्या मेंढीला.--, नानासो प्रताप हरी पाटील अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त भारुड स्पर्धेत नांद्रा भजनी मंडळाचे उत्तम सादरीकरण
लांडगा आला रे.,लांडगा आला., धनगरा सांभाळा आपल्या मेंढीला.--, नानासो प्रताप हरी पाटील अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त भारुड स्पर्धेत नांद्रा भजनींचे उत्तम सादरीकरण नांद्रा ता. पाचोरा (प्रतिनिधी-प्रा यशवंत पवार ) भडगाव येथे शिक्षण महर्षी नानासाहेब प्रताप हरी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य अशा विविध कार्यक्रमांच्या आयोजनाच्या प्रसंगी तालुकास्तरीय भजन - भारुड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये नांद्रा येथील सांप्रदायिक महादेव भजनी मंडळ येथील संपूर्ण भजनी मंडळ सदस्य यांनी सहभाग नोंदवून उत्कृष्ट वेषभूषा व सादरीकरण आवाजामध्ये आरोह-अवरोह करून उत्तम सादरीकरण केलेल्या लांडगा आला रे..,लांडगा आला., धनगरा सांभाळ तुझ्या मेंढीना ! या भारुडाला प्रत्यक्ष बगीतांनी उत्तम असा प्रतिसाद दिला असून येत्या 28 सप्टेंबर रोजी नानासाहेब प्रताप हरी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बक्षीस वाटप होणार आहेत या कार्यक्रमात ह्या भजनी मंडळाचा अव्वल क्रमांक येईल अशी अपेक्षा या महादेव भजनी मंडळ यांना आहे,महादेव भजनी मंडळ हे नांद्रा येथे व परिसरामध्ये कायम उत्तम सांप्रदायिक भजन,गवळण, भारुड
अशा कार्यक्रम सांप्रदायिक सादरीकरणासाठी प्रसिद्ध आहेत या भजनी मंडळाचे सदस्य एकनाथ बाविस्कर,संजय सूर्यवंशी,रामदास तावडे शेखर कुंभार, प्रकाश बोरस, सुभाष सिरसमणीकर, गंगाधर खैरनार,शिवाजी महारू पाटील, बालू नामदेव पा,किशोर रामदास पा, पुंडलिक रामा पा, सूर्यभान राजाराम पा, या सर्वांनी या कार्यक्रमातील भारुडामध्ये आपला उत्तम प्रकारे सहभाग नोंदविला

No comments