नांद्रा परिसरात अतिवृष्टी मुळे पिके नेस्तनाबूत तातडीने पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी नोंदवले क्रॉप इन्शुरन्स वर तक्रारी
नांद्रा परिसरात अतिवृष्टी मुळे पिके नेस्तनाबूत तातडीने पंचनामे करण्याची मागणी -- शेतकऱ्यांनी नोंदवले क्रॉप इन्शुरन्स वर तक्रारी नांद्रा ता. पाचोरा (प्रतिनिधी प्रा. यशवंत पवार ) सालाबादप्रमाणे यावर्षीही निसर्ग राजाच चक्र शेतकऱ्यांच्या जीवाशीच येत असल्याने शेतकरी हा दरवर्षी कायम अस्मानी सुलतानी संकटानी पिळला जात असतो, यावर्षीही ऐन हाथा तोंडाशी आलेला घास गेल्या आठ दिवसापासून अति मुसळधार पावसामुळे व अति सोसाट्याच्या वाऱ्यामुळे संपूर्ण खरीप पिके आडवी व जमीनदोस्त होऊन नेस्तनाभूत होत आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात कपाशी आडवी होऊन कैऱ्या सढायचे प्रमाण,फुल फुगडी गळणे, मके खोडून शेतात पडून असल्यामुळे पाण्यावर तरंगत आहेत,सोयाबीन सडत आहेत व मोठ्या प्रमाणात दादर, जवारी व इतर कडधान्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे तरी या उत्तराच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसाना संदर्भात प्रधानमंत्री फसल
विमा योजना अंतर्गत कंपनींना 72 तासात इंस्टीमेशन देणे गरजेचे असल्याने क्रॉप इन्शुरन्स एप्लीकेशन वरून शेतकरी मोबाईल द्वारे मोठ्या प्रमाणात तक्रार दाखल करत आहेत तरी कंपनी वाल्यांनी तक्रारीची नोंद
घेऊन त्वरित स्पॉट पंचनामें साठी हजर राहावे अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे तसेच वरिष्ठ पातळीवर आमदार,खासदार व लोकसेवक यांनी सुद्धा तातडीने शासकीय अधिकाऱ्यांना पंचनामाचे आदेशित करावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे



No comments