अग्निपंख क्लासेसच्या, अग्निवीरांची उत्तुंग भरारी, घनश्याम सरांचं शिकवण भारी.!
अग्निपंख क्लासेसच्या, अग्निवीरांची उत्तुंग भरारी, घनश्याम सरांचं अध्यापन भारी.! नांद्रा ता. पाचोरा (प्रतिनिधी प्रा. यशवंत पवार ) येथील श्री घनश्याम प्रकाश खैरनार हे गेल्या दहा वर्षापासून गावातील दहावी झाल्याबरोबरच नवतरुण यांना आपल्या छोट्याशा " अग्नी पंख" क्लास च्या माध्यमातून ग्राउंड वरील
शारीरिक फिटनेस बरोबरच स्पर्धा परीक्षा व भरतीपूर्व पेपर साठी असणाऱ्या सैन्य दलाच्या परीक्षा यांच्यासाठी रात्री चार चार तास अध्ययन- अध्यापन करून घडवण्यासाठी तत्पर लोकसेवा देत आहेत, याबरोबरच महापुरुषांची जयंती राष्ट्रीय सण या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये चुरस निर्माण व्हावी म्हणून ते 50 मार्काचे पेपर ठेवून त्यांना बक्षीसही खिशातून देतात व प्रोत्साहन देतात त्यांच्या या मार्गदर्शनामुळे नांद्रा परिसरातील अनेक नवतरुण मेहनत घेऊन गरीब व सर्वसामान्य कुटुंबातील मुलं आज मोठ्या प्रमाणात सैन्य दलात भरती होऊन आपल्या,मोल मजुरी करून,कष्टकरी माता-पितांचं ऋण, फेडण्यासाठी व मातृभूमीच्या सेवेसाठी सीमेवर कर्तव्य बजावत आहेत, काही विद्यार्थी मेरिट लिस्ट वर अडकलेले आहेत तर काही विद्यार्थी आता चालू भरती ही झालेले आहेत, घनश्याम सरही थोड्या थोड्या गुणांसाठी क्लास वन,क्लास टू ची
एमपीएससीची परीक्षा राहिलेले आहेत त्याच प्रमाणे भरती झाल्यावर तरुण एकमेकांना पुढील भरती साठी पेढे भरवून शुभेच्छा ही देतात,तरी त्यांच्या या अग्निपंखाच्या क्लासेस मार्फत परिसरातील होतकरू तरुणांना भरतीपूर्व पेपर सोडवण्यासाठी मिळणार मोफत मार्गदर्शन मुळे त्यांचं संपूर्ण परिसरात कौतुक व अभिनंदन होत आहेत ते सामाजिक कार्यकर्ते व जनसेवक ग्रामपंचायत सदस्य किशोर भाऊ खैरनार यांचे लहान बंधू आहेत


No comments