Breaking News

नांद्रा येथील डिगंबर पाटील यांना संगीत कलेचा छंदच निराळा, नवरात्री पासून श्रीराम आश्रमात जमणार शिकणाऱ्यांचा गोतावळा.


नांद्रा येथील डिगंबर पाटील यांना संगीत कलेचा छंदच निराळ,नवरात्री पासून श्रीराम आश्रमात जमणार शिकणाऱ्यांचा गोतावळा.                          नांद्रा ता.पाचोरा                                (प्रतिनिधी-प्रा. यशवंत पवार ) 
            येथील प.पू. श्री 1008 डॉ.स्वामी विष्णूदा्सजी महाराज यांच्या पावन श्रीराम आश्रमात अतिशय धार्मिक,सांप्रदायिक, निसर्गरम्य वातावरणात नांद्रा येथील सुपुत्र श्री दिगंबर नामदेव पाटील हे शैक्षणिक संस्थेत शाळेत कर्मचारी पदावर गेल्या 35 वर्षापासून कार्य करत असताना त्यांनी 1980 पासून आपल्या जीवनामध्ये संगीत या कलेला एक वेगळे स्थान देऊन या कलेची जोपासना केली, याबरोबरच परमपूज्य डॉ. विष्णूदासजी महाराज यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनातून ते या संगीतकलेत घडत गेले त्यामध्ये त्यांच्यावर वेळोवेळी अनेक संकट आली परंतु त्यांनी आपला तबलावादन,

हार्मोनियम वादन, याची साथ कधी सोडली नाही आपल्या शाळेच्या कार्यक्रमांमध्ये ते कर्मचारी असूनही त्यावेळी त्यांनी आपला संगीताचा अविष्कार दाखवून संपूर्ण सांस्कृतिक कार्यांना साद दिली, त्याचप्रमाणे परिसरात व तालुक्यात धार्मिक,सांस्कृतिक, सप्ताह, कीर्तने,शैक्षणिक कार्यक्रमात पेटीवादक,तबलावादक व गायनाचार्य म्हणून त्यांची विशेष भूमिका असून त्याची वेगळी ख्याती आहे. त्यामुळे आत्ता सेवेनिवृत्तीनंतरही ते नांद्रा परिसरात पुढील आयुष्य आता संगीत कलेसाठीच वाहून घेण्याचे ठरवून याचा एक भाग म्हणून नांद्रा येथील श्रीराम आश्रम येथे निशुल्क नवरात्रीचा स्थापनेच्या दिवसापासून दि. 3 ऑक्टोबर वार मंगळवार  वाजेपासून सुरुवात होणार असून दर शनिवार व रविवार सप्ताहातील दोन दिवस पूर्ण वेळ सेवा देण्यात येईल या शिबिराचे उद्घाटन त्याच दिवशी 3 ऑक्टोंबर मंगळवार रोजी सकाळी 10 वाजता श्रीराम आश्रम येथे मठाधिपती डॉ. प. पु. विष्णूदासजी महाराज व गावातील पदाधिकारी व संगीतप्रेमी यांच्या शुभहस्ते होणार आहेत.   या शिबीरामध्ये तबलावादन,पेटीवादन, हार्मोनियम वादन गायनामधील आरोह - अवरोह याबरोबरच शास्त्रीय संगीतातील भक्ती

गीत,युगलगीत,सांप्रदायिक,भजने शास्त्रीय गाणे अशा विविध प्रकारच्या संगीतातील बारकावे ते आपल्या संगीत ज्ञानदानातून मार्गदर्शन करणार आहेत तरी परिसरातील संगीत प्रेमींनी या ठिकाणी मोफत या प्रात्यक्षिक व शिकण्याचा आनंद घ्यावा व समाजात संगीताची आवड दिवसेंदिवस वृद्धीगत होवो याच पारदर्शक हेतूने डिगंबर पाटील यांनी हे कार्य सुरू केले असून त्यांनी जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे

No comments