नांद्रा येथे उद्या स्व.कैलास रामकृष्ण तावडे यांच्या स्मरणार्थ शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्र रंगभरण स्पर्धेचे आयोजन
नांद्रा येथे उद्या स्व.कैलास रामकृष्ण तावडे यांच्या स्मरणार्थ शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्र रंगभरण स्पर्धेचे आयोजन नांद्रा ता.पाचोरा (प्रतिनिधी-प्रा यशवंत पवार ) येथे दिनांक 5 ऑक्टोंबर वार शनिवार रोजी सकाळी 8 वाजता माजी सभापती नितीन कैलास तावडे व अमोल कैलास तावडे यांचे वडील स्व.कैलास रामकृष्ण तावडे यांच्या चतुर्थ स्मरणदिन निमित्त प्राथमिक व माध्यमिक शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्र रंगभरण चित्रकला स्पर्धेचे आयोजन सकाळी ठीक 8. वाजता आप्पासाहेब पी एस पाटील माध्यमिक विद्यालय नांद्रा व नवीन माध्यमिक विद्यालय कुरंगी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांद्रा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुरंगी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बांबरुड या ठिकाणी आयोजित केलेले आहे तरी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन दादासो नितीन कैलास तावडे अध्यक्ष ग्रामविकास फाउंडेशन यांनी केले आहे

No comments