एका कृषी सहाय्यकाला,इतकी सजा का ?
..एकाच कृषी सहाय्यकाला,इतकी सजा का ? नांद्रा ता. पाचोरा (प्रतिनिधी -प्रा यशवंत पवार ) नांद्रा - बांबरुड सर्कल अंतर्गत अनेक गाव व संपूर्ण तालुक्यात ही अनेक गाव सन 2023 च्या कपाशी व सोयाबीन झालेल्या प्राप्त दुष्काळ अनुदान साठी कधी ई -केवायसी,कधी प्रतिज्ञापत्र, कधी बँक ई - केवायसी कधी आधार अपडेट नाही अस्या कारणाने शेतकरी वर्ग कधी कृषी अधिकारी कार्यालया ला भेट देऊन आपल्या पदरीचा पैसा खर्च करून कृषी सहाय्यक यांची भेट होत नसल्याने आपले अनुदान खात्यात कधी जमा होईल याची विचारणा करण्यासाठी कृषी सहायक बागुल साहेब यांना फोनवरून विचारणा करत असताना त्यांच्याशी संपर्क होत नाही आहे परंतु कृषी सहाय्यक बागुल साहेब यांनी मात्र माहितीस्तव छान उत्तर दिले आहे अगोदर एकाच शेतकऱ्यांच्या नावाने असलेल्या उताऱ्यामुळे शेतीचे हेक्टरी अनुदान बँकेत जमा झाले आहेत परंतु सामायिक क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांचे अनुदान मात्र संमती पत्र नसल्यामुळे अजूनही प्रलंबित आहे यासंदर्भात नांद्रा येथील कृषी सहाय्यक बागुल साहेब यांना शेतकरीही फोन करून माहिती विचारात असल्याने त्यांनी सरळ व्हाट्सअप ग्रुपला टाकलेला खालील मेसेज वरून अक्षरशा त्यांची दिवस रात्र शासकीय कामात किती धावपळ होत आहे व त्यामुळेच त्यांना इतकी सजांची गावे का? दिले आहेत असा ही प्रश्नही यामुळे निर्माण होत आहे वाचा 👇🏻 मुख्य सजा 1) शिंदाड
२) कडेवडगाव
३) पिंप्री खुप्रपा
अतिरीक्त सज्जा
४) नांद्रा
५) हडसन
६) वडगाव खु प्र . पा
७) दुसखेडा
८) परधाडे
अतिरीक्त सजा ( 2) गावे संख्या 3
९) बांबरूड प्र बो
१०) आसनखेडा खु
११) आसनखेडा बु
अतिरिक्त सज्जा
१२) जामने
१३) सार्वे बु प्रलो
१४) भोकरी
१५) वरखेडी खु
१६) वरखेडी बु
या गावांचा पदभार मी सांभाळत आहे
एवढ्या गावाचे काम करत आहे .
त्यामुळे मला खुप धावपळ होत आहे. व मानसीक त्रास ही होत आहे.
एका गावातून 100 लोकांचे जरी पैसे पडले नसतील तरी 1600 कॉल होतील प्रती मीनीट जरी कॉल चालला तर किती वेळ होतो मला किती फोन येत असतील माझ्या मेंदुची काही क्षमता असेल का , कॉल उचलणे त्यांच्याशी बोलणे , एकट्या माणसाला शक्य आहे का , मोबाईल स्वीच ऑफ होऊ शकतो का
इत्यादी बाबींचा सारासार आपण करावा . असो 11 वर्ष झालेत मला नांद्रा गावाचा पदभार सांभाळत आतापर्यंत अशी वेळ तर नव्हती
आपले सर्व गावाचे मला भरपुर सहकार्य लाभले आहे , भविष्यात सहकार्य नसले तरी माझ्या विषयी गैरसमज नसावा अशी अपेक्षा असे कर्तव्यदक्ष कृषी सहाय्यक बागुल साहेब हे शेतकऱ्यांच्या मदतीला कायम धावून येत असतात परंतु अधिभाराखाली व इतक्या गावांच्या लोड मुळे त्यांचे इतर गाव नवीन कौशल्य विकास प्रशिक्षण अंतर्गत नवीन कृषी पदविका झालेल्या तरुणांना भरती करून का संधी देत नाहीत अशी चर्चा शेतकरी वर्गामध्ये निर्माण होत असून नुकतेच बॅटरी पंप वाटण्याचा लोड ही अतिरिक्त त्यांचे व कर्मचारी अधिकाऱ्यांवर आहे तरी या सर्व गोष्टींचा शासनाने सारासार विचार करून लवकर कृषी सहाय्यक नवीन भरती किंवा नव तरु णांना कॉन्टॅक्ट बेस वर नियुक्ती द्यावी अशी मागणी शेतकरी वर्ग व उच्च कृषी पदविकाधारक तरुणांकडून होत आहे

No comments