सततधार पावसामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम नेस्तनाबूत होण्याच्या मार्गावर
सतंतधार पावसामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम नेस्तनाबूत होण्याच्या मार्गावर नांद्रा ता.पाचोरा - ( प्रतिनिधी प्रा. यशवंत पवार) गेल्या चार दिवसापासून पुन्हा उत्तरेचा पावसाने ठिकठिकाणी हा..हा..कार माजवला असून ऐन शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला खरीप हंगाम ही नेस्तनाबूत होण्याची भीती शेतकरी वर्गामध्ये निर्माण झाली आहे, या मध्ये सोयाबीन, मक्का काढणीला आला आहे त्यामुळे एकतर शेतातच त्यांना कोंब फुटत आहेत किंवा बाजारपेठेत भाव नाही, कपास वेचणीवर आहे परंतु त्याही कवड्या कापूस व मजुरी ही भरमसाठ लागत आहे मजुरांची टंचाई, फळबाग मध्ये लिंबोणीच्या बागा, सिताफळाच्या भागा,पेरूच्या बागा, केळीच्या बागाही कोरमडत आहेत तसेच धान्य मार्केट पावसामुळे बंद आहे व भावही कमी आहे,कपाशीलाही भाव नाही. त्यामुळे यावर्षी ही उत्पादनातही मोठी घट निर्माण झाली आहे अशा एक ना अनेक समस्या मुळे शेतकरी वर्ग हवालदील झाला असून सालाबा दाप्रमाणे निसर्गाचे हे अस्मानी-सुलतानी संकटांचे चक्र या वर्षी ही शेतकऱ्यांच्या राशीला सोडण्याचे नाव घेत नाही आहे, मागील वर्षी प्रधानमंत्री पिक विमा योजना मुळे एक रुपयात पीक विम्याचा काहीसा फायदा आता मात्र यावर्षी काही शेतकऱ्यांना होताना दिसत असून सर्वच शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळावा अशी ही मागणी होत आहे. यावर्षीही ही मागच्या वर्षी सारखीच सततधार पावसामुळे खरीप पिकांचे कापूस, मका सोयाबीन, फळबाग व इतर कडधान्य पिकांचे होणारे नुकसान भरपाई पंचनामें सरसकट होऊन शासन दरबारी भरपाई मिळण्यासाठी पिक विमा कंपनी यांना 72 तासातील अतिवृष्टी झालेल्या परिसरात शेतकरीनी केलेल्या तक्रार मेसेज ची नोंद घेऊन स्पॉट पंचनामे करण्यासाठी आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी यांनी संबंधित विभागाला व विमा कंपनींना आदेशीत करावे अशी मागणी शेतकरी वर्गकडून होत आहे.

No comments