पाचोरा - भडगाव तालुक्यात गिरणा नदीवर आत्ता पर्यंत सात पुल उभारली , गावा गावात रस्त्यांचे जाळे विणले,महाराष्ट्रात सर्वात प्रथम प्रत्येक गावात शक्तीपीठ म्हणून शिवस्मारक उभारणी केल्याचा मला सार्थ अभिमान -स्वाभिमान - आमदार किशोरआप्पा पाटील
पाचोरा - भडगाव तालुक्यात गिरणा नदीवर आत्ता पर्यंत सात पुल उभारली , गावा गावात रस्त्यांचे जाळे विणले,महाराष्ट्रात सर्वात प्रथम प्रत्येक गावात शक्तीपीठ म्हणून शिवस्मारक उभारणी केल्याचा मला सार्थ अभिमान -स्वाभिमान - आमदार किशोरआप्पा पाटील नांद्रा ता. पाचोरा (प्रतिनिधी- प्रा. यशवंत पवार ) माहेजी व हनुमंतखेडा याला गिरणा नदीवरील जोडणारा पूल उद्घाटन प्रसंगी आज नांद्रा सह परिसरातील कुरंगी,माहेजी,वरसाडे आसनखेडा, लासगाव, सामनेर, बांबरुड, खेडगाव मोहाडी,हडसन, पहाण, व परिसरातील गावांच्या सरपंच,उपसरपंच,सदस्य सह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व शिवसैनिक यांच्या उपस्थितीत आज या पुलाचा भूमिपूजन समारंभ आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला याप्रसंगी अगोदर माहिजी देवीची दर्शन घेऊन गिरणा नदीच्या थडीला पूजन करून नारळ, ओटी,वाहून, टिकावं टाकून भूमी पूजन करण्यात आले तसेच गावातील विविध शासकीय क्षेत्रात निवड झालेल्या तरुणांचा सत्कार मध्ये कुमारी तेजस्विनी बडगुजर ही महाराष्ट्र राज्य कुस्ती स्पर्धेत निवड झाल्यामुळे तिचा सत्कार तसेच दिनेश कमलाकर बडगुजर आर्मीमध्ये
भरती झाल्यामुळे अविनाश पंढरीनाथ पाटील हायकोर्ट स्टेनो मध्ये व सचिन बडगुजर याचीही आय. टी. आय प्रोफेसर पदी नियुक्ती झाल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच माहेजी जय गुरुदेव सत्संग साधक यांच्याकडूनही किशोरआप्पांच्या सत्कार करण्यात आला याप्रसंगी किशोर आप्पा पाटील त्यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की स्वातंत्र्यानंतर गिरणा नदीवरील दळणवळण सोयीस्कर व्हावे म्हणून आत्ता पर्यंत आपण पाचोरा भडगाव तालुक्यातील सात पुलांचे गिरणा नदीवर पूल पूर्णत्वास नेले,प्रत्येक खेडूपाड्यांना रस्त्याने जोडून
रस्त्याचे जाळे विणले तसेच एम एस इ बी कंपनी चे या गटात स्वतंत्र सबस्टेशन निर्माण करून पुढे खेडगाव लाही नवीन सबस्टेशन चे टेंडर निघाले आहे याबरोबरच पिण्याच्या वॉटर सप्लाय विहिरी साठी 24 तास गावठाण फिटरची व्यवस्था करण्यात चे कार्य सुरू आहे तसेच आसनखेडा,बांबरुड, बहुळेश्वर,सामनेर,वेरूळी असे रस्ते विविध मार्गांनी जोडणे सुरू आहे आत्तापर्यंत सुमारे 3000 करोड रुपयांची कामे केली परंतु त्यामध्ये मला कधीच कोणत्याच कामाचा व गोष्टी चा अभिमान व स्वाभिमान नाही परंतु एका गोष्टीचा व कामाचा मात्र मला सार्थ अभिमान व स्वाभिमान आहे ते म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचं दैवत असणारे माझ्या राजाचे छत्रपती शिवाजी महाराज यांचे संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम पाचोरा भडगाव तालुक्यात प्रत्येक गावात शंभर टक्के शिवस्मारक उभारणीचे कार्य माझ्या हातून झाले याचा मला अभिमान व स्वाभिमान असल्याचे सांगितले व यानंतर प्रत्येक शिवस्मारकावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी रीतसर परवानगी घेऊन आपण ते सुद्धा कार्य ही मार्गी लावू अशी ग्वाही दिली या बरोबरच सततधार पावसामुळे शेतकऱ्यांचं खरीप पिकांच्या नुकसानीत कापूस सोयाबीन, मका यांचे होणाऱ्या प्रचंड प्रमाणात नुकसानीचे कृषी अधिकारी तहसीलदार व प्रांताधिकारी यांना सांगून सरसकट
दुष्काळ जाहीर करावा व पिक विमा कंपन्यांना सूचना कराव्यात या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे आपण मागणी केले असल्याचे सांगितले.तसेच चारशे किलोमीटर शेत रस्ते मंजूर आहेत याप्रसंगी कार्यक्रमाला सूत्रसंचालन प्रा. यशवंत पवार यांनी केले तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि. प. सदस्य पदमसिंह पाटील,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गणेश बापू पाटील, हेमंत चव्हाण,धर्मा भाऊ बाविस्कर,पंढरीनाथ पाटील,जितेंद्र जैन,प्रवीण ब्राह्मणे,विनोद तावडे, प्रदीप अण्णा पाटील, मुन्ना डॉक्टर,बाळू तात्या वेरुळी,सरपंच सुभाष अण्णा तावडे, किरण पाटील,शिवाजी तावडे,,गजानन पवार, मनोज आप्पा पाटील,समाधान पाटील, पत्रकार राजू
पाटील,पंकज बाविस्कर ,जगताप पाटील, युवराज काळे,नरेश पंडित पाटील,पवन साहेबराव पाटील, हरीश भिमराव पाटील,समाधान रामराव पाटील, गणेश रमेश पाटील, कैलास नारायण पाटील, गौतम साळवे,हरीष पाटील, शिवाजी काशिनाथ पाटील,विकास विठ्ठल पाटील, शुभम राजेंद्र पाटील, राजू पवार, फुलचंद बडगुजर,समाधान चिंधु पाटील,राजेंद्र गायकवाड,मोहित पाटील,आनंदा बोरसे,सह विविध सेना पदाधिकारी व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन प्रवीण ब्राह्मणे यांनी मांडले





No comments