मोबाईल रजिस्टर नसल्याने व ऑनलाइन बुकिंग ओटीपी मुळे एन सणात लागली गॅस सिलेंडर मिळण्यासाठी घर घर
मोबाईल रजिस्टर नसल्याने व ऑनलाइन बुकिंग ओटीपी मुळे एन दिवाळी सणात लागली गॅस सिलेंडर मिळण्यासाठी घर घर नांद्रा ता.पाचोरा (प्रतिनिधी -प्रा यशवंत पवार ) आज प्रत्येक घरात जीवनावश्यक वस्तूमध्ये गॅस सिलेंडर ला मूलभूत स्वयंपाक "घराचा राजा" म्हणून एक ओळख आहे, त्यामुळे सिलेंडर हंडी ला गृहिणींच्या बजेटमध्ये विशेष महत्त्व आहे,परंतु आता काही दिवसा पासून सिलेंडर मात्र ऑनलाईन बुकिंग केल्यावरच मिळत असल्याने साधारणता सहा ते सात दिवस त्या हंडीला डिलिव्हरी ला वेळ लागत असल्याने सिलेंडर साठी घरघर बघावयास मिळत असून अगोदर शेजारीपाजारीही सहज एकमेकांना सहकार्याच्या भावनातून उपलब्ध होत असलेली हंडी ही प्रत्येकाच्या घरामध्ये आता खाली बघावयास मिळत आहे. शासनाकडून उज्वला योजनेअंतर्गत गॅसधारक यांना मोफत 3 सिलेंडर व इतरही सबसिडी येत असल्याने आता प्रत्येक गॅसहंडी रजिस्टर मोबाईलवर बुकिंग करून ओटीपी सांगूनच किंवा हंडी बुकिंग केल्यावर मोबाईल रजिस्टर नसल्यास पुन्हा त्याला सहा अंकी नंबर रजिस्टर करून पुन्हा चार अंकी ओटीपी मिळवून मगच गॅस हंडी वितरण करणारे डिलिव्हरी बॉय यांना ग्राहक यांना करावं लागत आहे त्यामुळे अगोदर सहजच मिळणारी हंडी आता मात्र सहज मिळत नसून, डिलेव्हरी करणारे व्यक्ती ला एक एका घराजवळ एक हंडी डिलिव्हरी करायला जवळपास ही सर्व ऑनलाईन प्रोसेस करायला दहा ते पंधरा मिनिटं वेळ जात असल्याने बुकिंग करूनही पाच ते सहा दिवस ग्राहकांना मात्र त्यामुळे हंडीसाठी वेटिंग करावं लागत आहे, याबरोबरच मोबाईल धारक ग्राहक घरी नसला किंवा फोन लागला नाही तर त्यामुळे ते चलन डिलिव्हरी ऑनलाइन होत नसल्याने ती एक समस्या वेगळी याबरोबरच अनेक ग्राहकांनी अजूनही ई केवायसी केली नसल्याने त्यांचे मोबाईल आधार कार्ड लिंक नसल्याने सबसिडी जमा होण्याची समस्या निर्माण वेगळी. त्यामुळे ग्राहकांनी आपले मोबाईल फोन खात्याला लिंक करणे गरजेचे आहेत,याबरोबरच गॅस हंडी डिलिव्हरी सुद्धा एन दिवाळी सणात बुकिंग केल्यानंतर दोन दिवसात मिळण्याची अपेक्षा ग्राहक वर्गांमधून होत आहे

No comments