नांद्रा येथे अतिवृष्टीचे शेतकऱ्यांची पंचनामा करण्यासाठी महसूल अधिकारी आले शेकडो शेतकऱ्यांच्या बांधांवर
नांद्रा येथे अतिवृष्टीचे शेतकऱ्यांची शेतीचे पंचनामा करण्यासाठी महसूल अधिकारी आले शेकडो शेतकऱ्यांच्या बांधांवर नांद्रा ता. पाचोरा प्रतिनिधी (प्रा. यशवंत पवार ) येथे नांद्रा परिसरात गेल्या पंधरा दिवसापासून परतीच्या पावसाने अक्षरशा झोडपून काढले असून संपूर्ण खरीप हंगामाचा हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेण्यात आल्याने संपूर्ण पिके नेस्तनाबूत झाल्याचे चित्र दिसत असून त्यामध्ये नांद्रा येथे 13 ऑक्टोबर रोजी अतिवृष्टीची नोंद शासकीय पर्जन्यमापन मध्ये 67 एमएम च्या वर झालेली आहे त्यामुळे सोयाबीन,मका,कापूस या पिकांचे त्यामुळे अतोनात नुकसान झाले असून यासाठी आज दिनांक 18 ऑक्टोंबर रोजी शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर तलाठी महसूल अधिकारी नदीम शेख,कृषी सहाय्यक अभिजीत पाटील, नव नियुक्त तलाठी जिज्ञासा पाटील, यांच्या सह पोलीस पाटील किरण तावडे तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष बाविस्कर, सरपंच सुभाष तावडे,उपसरपंच शिवाजी तावडे,पत्रकार प्रा. यशवंत पवार,शेतकरीबंधू जिभाऊ सातपुते,आप्पा सूर्यवंशी,मनोज भाऊराव
सूर्यवंशी,विनोद बाविस्कर,संजय पाहुणे, सुनील तावडे, बापू बोरसे,बंटी सूर्यवंशी,अनिल बोरसे, रवी सूर्यवंशी, गुलाब बाविस्कर , ओम पवार,रवींद्र तावडे,सह शेकडो शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अतिवृष्टीची पाहणी करून नेस्तनाबूत झालेल्या पिकांची अवस्था फोटोद्वारे नोंदवली आहे याबरोबरच उतारावरील क्षेत्र व ई-पिक नोंदवलेले क्षेत्र व केलेली पिकांची लागवड यांची नोंद शेतकऱ्यांकडून नोंदवून सह्या घेऊन पंचनामाचे कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. तरीया परतीच्या अतिवृष्टी मुळे झालेल्या पंचनामे यांची दखल घेऊन त्वरित सरसकट नुकसान भरपाई मिळावी व त्याच प्रकारे यादरम्यानच काही शेतकऱ्यांनी पिक विमा कंपनींना इंस्टीमेशन देऊनही मोजक्याच शेतकऱ्यांचे त्यामध्ये पंचनामे झाले असून इतर पंचनामे बाकी आहेत तरी इतर शेतकऱ्यांची ही विमा कंपनीने पंचनामे करण्यासाठी यावे अशी मागणी नांद्रा परिसरातील शेतकरी वर्गाकडून होत आहे



No comments