कर्ज खात्यातील विमा पैसे देण्यास बँक शेतकऱ्यांना म्हणते ना ! व रोखही रक्कमाचा तिजोरीत ठणठणाट!
कर्ज खात्यातील विमा पैसे देण्यास बँक शेतकऱ्यांना म्हणते ना ! व रोखही रक्कमाचा तिजोरीत ठणठणाट! नांद्रा ता.पाचोरा- (प्रतिनिधी प्रा. यशवंत पवार) सालाबाद प्रमाणे निसर्गाचा लहरीपणा व अस्मानी सुलतानात भरडला गेलेला त्यामध्ये यावर्षी ही दुष्काळ सदृश्य परिस्थितीत असताना मागील वर्षीचे पिक विमा ची आलेली रक्कम थेट कर्ज खात्यात जमा झाल्याने बँक अधिकारी ते काढण्यास मात्र शेतकऱ्यांना ना!करत आहेत. अगोदरच कर्जाचा डोंगर डोक्यावर घेऊन याच आलेल्या अनुदानावर शेतकरी आपला उदरनिर्वाह व शेतीला लागणारा काहीसा खर्च भागवण्यासाठी तारेवरची कसरत करत असतानाच मागील वर्षाचा सन 2023 चे पिक विम्याची रक्कम ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता त्यांच्या कर्ज खात्यांमध्ये डायरेक्ट वर्ग झाल्यामुळे आता मात्र शेतकऱ्यांना नांद्रा परिसरातील बँक ऑफ बडोदा शाखेमध्ये आपले हक्काचे पैसे चकरा मारून विनंती करूनही पैसे मिळत नसल्याने बँकेविषयी शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होत आहे तर संबंधित बँक अधिकारी बोलतात की तुम्ही कर्ज खात्यातील पैसे कर्जात जमा आहेत वरचे व्याज भरा किंवा रेनीव्ह करा परंतु शेतकरी बंधूंनीच अगोदर आपल्या अवघ्या एक लाखाच्या पुढच्या कर्जासाठी लाखो रुपये किमतीची शेतजमीन अगोदरच बँकेनं मॉर्गेज करून घेतली आहे तरीही ही येणारी तुटपुंजी रक्कम शेतकऱ्यांना काढून देण्यास बँक अधिकाऱ्यांचे का ना!.. करत आहे हा प्रश्न शेतकरी वर्गामध्ये निर्माण होत आहे,यामध्ये दरवर्षी शेतकरी वर्ग आपले कर्ज खाते नियमित भरणा करून अलटी पलटी करत असतात परंतु मध्यंतरी ज्यावेळेस आता शेतकऱ्यांना यावर्षीही दुष्काळ सदृश्य परिस्थिती दिसत असताना बँक अधिकारी मात्र अशा आडमुठे धोरणाने शेतकऱ्यांना का वेटीस धरत आहे हा प्रश्न शेतकऱ्या वर्गामधून व कर्जदार खातेदारांमधून निर्माण होतात असून अजूनही नवीन बरेच शेतकऱ्यांच्या कर्ज मागणी खात्याच्या फायलींचे बँक ऑफ बडोदा शाखेत पडलेल्या असून, विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशन लोन ही देण्यास ना!,लाडकी बहीण योजना त्याचे पैसे काढण्यासाठी गर्दी,संजय गांधी निराधार वयोवृद्ध पगार व विम्याचे पैसे काढण्यासाठी एकच गर्दी या सर्व समस्या मध्ये तासंतास बँकेसमोर एन शेतीच्या कामे सुरु असताना ताटकळ बसण्या शिवाय पर्याय नाही बँकेत रोख रक्कम ही शिल्लक नसल्याने शेवटी दोन दोन तीन दिवस वाट पाहून मात्र बँकेच्या तिजोरीतला ठणठणाट मुळे शेतकरी वर्ग व ग्राहक वर्ग यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे याविषयी संबंधित यंत्रणेला त्वरित योग्य मार्गदर्शन करून वरील संबंधित सर्व घटकांना योग्य न्याय देणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे

No comments