तब्बल 14 वर्गखोल्यात जाऊन व दीडशे उपकरणांची माहिती घेऊन रमले आमदार किशोरआप्पा पाटील भावी वैज्ञानिक- शास्त्रज्ञ विद्यार्थ्यांमध्ये
तब्बल 14 वर्गखोल्यात जाऊन व दीडशे उपकरणांची माहिती घेऊन रमले आमदार किशोरआप्पा पाटील भावी वैज्ञानिक- शास्त्रज्ञ विद्यार्थ्यांमध्ये
नांद्रा पाचोरा-(प्रा यशवंत पवार)
शिक्षण विभाग पंचायत समिती पाचोरा,माध्यमिक विद्यालय नांद्रा यांच्या संयुक्त विद्यमाने 52व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन २०२४-२५ तालुकास्तरीय मार्गदर्शन मेळावा व उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यामध्ये जवळजवळ 150 स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मांडणी करण्यात आली
होती प्राथमिक लहान गट व माध्यमिक मोठा गट,अपंग गट, सौर ऊर्जा, गट मोठे, इलेक्ट्रॉनिक्स गट, शिक्षकांचा गट अशा सर्व गटांनी सहभाग नोंदवला याप्रसंगी कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी विद्यार्थ्यांनी मांडलेल्या उपकरणांच्या एकूण 14 वर्ग खोलींच्या आत सुमारे 150 विविध मॉडेल मांडलेल्या उपकारनांविषयी, भित्तिपत्रकांविषयी व बाह्य पटांगणावरील निर्माण केलेले स्वयं हस्त यांत्रिक ट्रॅक्टर विषयी माहिती जाणून प्रत्यक्षात कशा रीतीने
कार्य करतात याविषयी कुतूहलाने विचारून प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये सुप्त गुण असतात त्या अनुषंगाने ते पुढे भविष्यात आपल्या देशाचे आयआयटी व देश-विदेशात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी व आपल्या विकसित देशात इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञानाच्या व वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या जोरावर भारताला महासत्ता बनवण्याचे कार्य निश्चितच शालेय दशेत विद्यार्थी विज्ञान प्रदर्शनातून व्यासपीठ मिळत असल्याने घडू शकतात असे असे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी विचार मांडले,कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शेंदुर्णी एज्युकेशन
सोसायटी सचिव सागर मलजी जैन,सहसचिव श्री यु. यु.पाटील तसेच पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गणेश पाटील,डायटचे अधिव्याख्याता सि.डी साळुंके, डायट चे प्राचार्य अनिल झोपे, गटविकास अधिकारी गोकुळ बोरसे,गटशिक्षण अधिकारी समाधान पाटील,शा. पो. आ.सरोज गायकवाड,एन एल परदेशी तसेच सर्व शिक्षा अभियानाचे डाटा ऑपरेटर भावेश अहिराव,श्री शिवदे,श्री शिरसाळे,श्री ठोकेसर, वरखेडी मुख्याध्यापक प्रशांत
गरुड, केंद्र प्रमुख मोराणकर, केंद्रप्रमुख नूर खान, माजी जि प सदस्य पदम पाटील,परधाडे सरपंच सचिन पाटील,लासगाव सरपंच समाधान पाटील, नांद्रा सरपंच सुभाषअण्णा पाटील,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष डॉ. वाय.जी पाटील,उपाध्यक्ष विश्वनाथ सूर्यवंशी, विनोद बाविस्कर,माजी सरपंच विनोद तावडे,पोलीस पाटील किरण तावडे, पत्रकार प्रा. यशवंत पवार, पत्रकार राजेंद्र पाटील,विविध शिक्षण विभागातील कर्मचारी
मुख्याध्यापक शिक्षक, शिक्षिका वृंद यांनी या विज्ञान प्रदर्शनात आपले विद्यार्थी समवेत आपला सहभाग नोंदविला होता या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन ठाकूर व आर्. एन.पाटील यांनी तर प्रास्तविक सरोज गायकवाड यांनी केले. कार्यक्रम यशस्वी साठी मुख्याध्यापक एस के पाटील व पर्यवेक्षक शिक्षक शिक्षिका वृंद वस्तीगृह अधीक्षक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले






No comments