नांद्रा येथे शिव महापुराण कथा सोहळा डॉ. स्वामी विष्णुदास महाराज यांच्या मधुर अमृत वाणीतून प्रारंभ
नांद्रा येथे शिव महापुराण कथा सोहळा डॉ. स्वामी विष्णुदासजी महाराज यांच्या मधुर अमृत वाणीतून प्रारंभ नांद्रा ता. पाचोरा वार्ताहर- (प्रा यशवंत पवार ) येथे श्रीराम आश्रम येथे डॉ.स्वामी विष्णूदासजी महाराज यांच्या मधुर अमृतवाणीतून शिव महापुराण कथा वाचन सोहळा प्रारंभ झाला आहे त्यामध्ये दिनांक 24 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता गावातून देवता शिव,पार्वती, कार्तिकी, गणपती यांचे सजीव देखावे,उंटावर बसून गावातून मिरवणूक काढण्यात आली त्याबरोबरच शिव महापुराण ग्रंथ ची ही
पालखीतून मिरवणूक व मागे रथातून कथाकार डॉ.स्वामी विष्णूदासजी महाराज यांची मिरवणूक काढण्यात आली. या धार्मिक,अध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाला माध्यमिक विद्यालयतील क्रीडाशिक्षक ठाकूर सर यांनी आपल्या विद्यार्थिनींनी यांच्या
पथकासह विविध लेझीम प्रकार करून शोभायात्रा वाढवली नंतर श्रीराम भजनी यांचे मागून सुंदर भजन याद्वारे दिंडी पालखी सोहळा उत्साहात संपन्न झाला तदनंतर आत्ता दि.25 डिसेंबर पासून दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत महापुराण कथा ज्ञानदान सोहळा संपन्न होत असून दिनांक 1 जानेवारी रोजी सकाळी 7 ते 10 होम हवन कार्यक्रम व 11 ते 3 महाप्रसादाचा कार्यक्रमाचे
आयोजन करण्यात आले आहे तरी परिसरातील भाविक भक्त यांनी शिव महापुराण श्रवणाचा लाभ घेण्याचे आवाहन श्रीराम आश्रम नांद्रा स्वयंसेवक यांनी केले आहे







No comments