Breaking News

लाडक्या मेंढपाळ बहिणीना चालू हप्ता मिळाल्याने शेतात काम करता करताच व्यक्त केला आनंद,मेंढ्यांच्या कळप चारण्यासाठी स्वतःच उपटून द्यावे लागते शेतकऱ्यांची कपाशी


लाडक्या मेंढपाळ बहिणीना चालू हप्ता मिळाल्याने शेतात काम करता करताच व्यक्त केला आनंद,मेंढ्यांच्या कळप चारण्यासाठी स्वतःच उपटून द्यावे लागते शेतकऱ्यांची कपाशी                         नांद्रा  ता. पाचोरा(वार्ताहार)-
(*प्रा. यशवंत पवार*)

" बिकट वाट वहीवाट नसावी धोपट मार्ग सोडू नको, संसारामध्ये उगाच असा भटकत फिरू नको" 

या कवी अनंत फंदी यांच्या उक्तीनुसार प्रत्येक व्यक्ती हा संघर्षातून पुढे घडत असतो ज्यामध्ये  बारा बलुतेदार समाज आपापले उदरनिर्वाचे साधन म्हणून आपलाच पारंपारिक व्यवसाय सांभाळत असतो अशाच लाडक्या बहिणी मेंढपाळ यांचा उद्योग बारा महिने मेंढी टाकण्याचा परंतु लाडक्या बहिणी योजना सुरू झाल्यापासून अशा या मेंढपाळ बहिणी यांनाही ते


कुठेही असले तरी त्यांच्या खात्यात महिन्याला पंधराशे रुपये जमा होत असल्याने त्यांचा आनंद त्यांच्या या फाटक्या संसाराला निश्चितच बळ देणारा ठरत आहे परंतु त्यांच्या मुलांचा शैक्षणिक दृष्ट्या शिक्षणाचा प्रश्न मात्र त्यांची कायम भटकंती असल्याने कायमच आहे अशाच नांद्रा शिवारात समर्थ पेट्रोल पंप जवळ एक मेंढपाळ कुटुंब तीन महिला शेतात कपाशी उपटत होत्या बाजूला त्यांचा तान्हेलं बाळ झाडाखाली झोपला होता बाकी मुलं झाडाखाली खेळत होती तर मेंढरं आपल्या सोयीनुसार मिळेल त्या खाद्यावर ताव मारत होती

त्यावेळेस मी त्यांच्या या संघर्षमय जीवनात विचारणा केल्यावर त्यांना लाडके बहिणीचा लाभ मतदानापूर्वी मिळाला व आताही नुकताच पडलेला हप्ता त्यांच्याजवळ मोबाईल नसल्यामुळे त्यांना पडला आहे की नाही अजून कळाला नाही तरी या 1500 रुपयाचा निश्चितच आमच्या कुटुंबाला हातभार लागतो व आमच्या फाटका संसाराला कुठेतरी ठिगळ देता येतं असे त्यांच्या या कासावीस झालेल्या चेहऱ्यावरून जाणवत होते.असे अनेक कुटुंब संपूर्ण महाराष्ट्रभर आहेत जे आपल्या उदरनिर्वाहासाठी मुलांच्या शैक्षणिक प्रवाहासाठी

आणण्यासाठी जीवनाशी संघर्ष करत आहेत परंतु कुठेतरी या लाडक्या बहिणींचा हा मिळणाऱ्या मानधनरूपी टेकू निश्चितच त्यांना फायद्याचा ठरत आहेत परंतु अजूनही ऊस तोडणी कामगार,वीट भट्टीवर काम करणारे कामगार, मेंढपाळ,गावोगावी मिळणारे व अनेक भटके कुटुंब े अजूनही हे त्यांच्या मुलांच्या शिक्षणापासून उपेक्षितच आहेत शासनाचे धोरण आधार कार्ड द्या व प्रवेश घ्या असे जरी असले तरी ज्यांच्या हाताच्या तळव्याच्याच रेषा बालपणापासून आई-वडिलांसोबत हे गाव,ते गाव,कुठल्या कुठे पोटाची खडकी भरण्यासाठी जात असल्याने त्यांना तरी नशीब म्हणून शिक्षणाचा अधिकार एकाच जागी कधी मिळणार हा प्रश्न मात्र कायमस्वरूपी निरोत्तरी राहत आहे हे मात्र निश्चित.

No comments