क्रिएटिव्ह स्कूल ला फूड फेस्टिवल 2025 उत्साहात, विद्यार्थ्यांनी केली खरी कमाई!
क्रिएटिव्ह स्कूल ला फूड फेस्टिवल 2025 उत्साहात, विद्यार्थ्यांनी केली खरी कमाई!
नांद्रा ता.पाचोरा (वार्ताहर )-
येथील क्रिएटिव्ह स्कूलला सालाबादप्रमाणे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व श्रमप्रतिष्ठा,नीटनेटकेपणा, सर्वधर्म सहिष्णूता,राष्ट्रीय एकात्मता व व्यवहार ज्ञान अशा मूल्यांची त्यांना प्रत्यक्ष अनुभूती व्हावी म्हणून "फूड फेस्टिवल 2025" बाल आनंद मेळाव्याचे आयोजन दिनांक 4 जानेवारी वार शनिवार रोजी करण्यात आले होते या कार्यक्रमाला
उद्घाटक म्हणून सरपंच सुभाष तावडे उपसरपंच शिवाजी तावडे तसेच माजी सरपंच बापू सर सूर्यवंशी,आसनखेडा सुपडू पाटील,पोलीस पाटील किरण तावडे,पत्रकार राजेंद्र पाटील,शिक्षणप्रेमी ओम भाऊ पवार,स्वप्निल बाविस्कर, सुरेश पाटीलसर,दुर्वास कोळी, पवन सूर्यवंशी,ज्ञानेश्वर सूर्यवंशी,मुनीर शेख,फारुक शेख,शाहरुख शेख,नूर खान सर, गजानन ठाकूर,घनश्याम बडगुजर, राहुल कोळी, गणेश पाटील, तुषार जावळे, योगेश म्हसाने, बापूजा सूर्यवंशी हे होते या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी विविध विटामिन युक्त खाद्यपदार्थांची जंत्री स्टॉल स्वरूपात लावून भित्तिपत्रक, स्टॉलचे नाव,किंमत असे आकर्षक फलक लावून
आकर्षक स्टॉल लावले होते, त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपले संपूर्ण खाद्यपदार्थ आप-आपल्या कौशल्याने विक्री करून त्यामधून खरी कमाईचा प्रत्यक्ष अनुभव घेतला यामुळे विद्यार्थ्यांचा आनंद वाखण्याजोगा होता.कार्यक्रमाला यशस्वीतेसाठी प्रा.यशवंत पवार,अरुंधती राजेंद्र,नम्रता पवार,शितल पाटील,प्रतिक्षा सिनकर,कीर्ती सिनकर,शीतल पाटील,आरती सोनवणे,पूजा सूर्यवंशी,चंद्रकला तावडे,भगवान गोपाळ,नवल पाटील,नामदेव पाटील यांनी परिश्रम घेतले




No comments