Breaking News

नांद्रा - माहेजी रस्त्यावरील काटेरी झाडे झुडपे तोडून व रस्त्यावरील खड्ड्यांची झाली डागडुजी


नांद्रा - माहेजी रस्त्यावरील काटेरी झाडे झुडपे तोडून व रस्त्यावरील खड्ड्यांची झाली डागडुजी

नांद्रा ता. पाचोरा (प्रतिनिधी )

(प्रा यशवंत पवार )

 नुकत्याच सुरू झालेल्या माहेजीमातेच्या यात्रोत्सवाला जिल्हाभरातून भाविक भक्त मोठ्या प्रमाणात येत असल्याने दरम्यान नांद्रा - माहेजी दरम्यान मोठ्या प्रमाणावर प्रवासी वाहतुका बरोबरच पादचारी व मोटरसायकल व बैलगाडी चालक यांची यात्रेदरम्यान मोठी वर्दळ असते.हि वर्दळ व रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या मोठे वाढलेले काटेरी झाडे झुडपे व ठीक ठिकाणी असणारे खड्डे यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहन चालवताना वाहनधारकास कसरत करावी लागत असल्याने या किरकोळ दुरुस्तीकडे नांद्रा, माहेजी,कुरंगी, वरसाडे ग्रामस्थ सह रिक्षा प्रवासी वाहन चालक यांनी पाचोरा भडगाव मतदारसंघातील आमदार किशोर आप्पा पाटील यांच्याकडे या संदर्भात दुरुस्तीची मागणीची केल्याने याची दखल घेत आमदार किशोर आप्पा पाटील यांनी पाचोरा बांधकाम विभागाचे उपअभियंता डी.एम.पाटील व शाखा अभियंता श्री काजवे यांच्या शी चर्चा करुन नांद्रा - माहेजी रस्त्यावरील काटेरी झाडे झुडपे व दुरुस्ती च्या रस्ता दुरुस्तीच्या संर्दभात नांद्रा येथील गव्हर्नमेन्ट काॅन्ट्रक्टर शरद तावडे यांना हि बाब लक्षात आणून दिली त्यानुसार नांद्रा - माहेजी या पाच किलोमीटर अंतरावरील रस्त्यावरील काटेरी झाडे झुडपे हे जे.सि.बी.च्या सहाय्याने साफसफाई करून रस्त्यावरील लहान मोठ्या खड्ड्यांची डागडुगी काम युद्ध पातळीवर सुरू करून ते पूर्णत्वासही शरद तावडे यांनी केले व अगोदर थातूरमातूर नुसतीच टाकेलली खडी यावर डांबरेचा काहीसा लेयर आल्यामुळे खड्डे बुज ल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांसह वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले आहे.


No comments