Breaking News

विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्ण कॉपीमुक्त परीक्षाला सामोरे जावे - चेअरमन संजय गरुड नांद्रा येथे आप्पासाहेब पी एस पाटील माध्यमिक विद्यालयाचा दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ उत्साहात


विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत उच्च यश संपादन करून आई-वडील,गाव, गुरुजन व शाळेचे नाव मोठे करावे- चेअरमन संजय दादा गरुड 

नांद्रा येथे आप्पासाहेब पी एस  पाटील माध्यमिक विद्यालयाचा दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ उत्साहात

 

नांद्रा ता.पाचोरा (प्रतिनिधी) (प्रा. यशवंत पवार)

 येथील धी शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटी संचलित आप्पासाहेब पी एस पाटील माध्यमिक विद्यालयच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ सोहळा दिनांक 7 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वा. संस्थेचे सहसचिव यु.यु.पाटीलसर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला याप्रसंगी संस्थेचे चेअरमन संजय दादा गरुड व संस्थेचे सचिव सागरमलजी जैन उपस्थित होते याबरोबरच स्थानिक सल्लागार समिती अध्यक्ष डॉ. वाय.जी.पाटील शालेय व्यवस्थापन समिती सदस्य विनोद आप्पा बाविस्कर, ग्रा. प. सदस्य किशोर भाऊ खैरनार,मनोज भाऊराव सूर्यवंशी,पत्रकार प्रा. यशवंत पवार हे उपस्थित होते याप्रसंगी दुपारी 12 वाजता अगोदर विद्यार्थ्यांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला दुपारी 2. वाजता विद्यालयाच्या प्रांगणात समारंभ प्रसंगी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले याप्रसंगी विद्यार्थी शाळेचे ऋण व्यक्त करीत असताना भावनिक झाले याबरोबरच मुख्याध्यापक एस के पाटील यांनी आपल्या प्रास्ताविक मध्ये सन 2024 25 च्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रगतीचा अहवाल आपल्या मनोगत आतून मांडून विविध स्कॉलरशिप स्काऊट शिबिर स्कूलचे लेझीम पथकाचा सामाजिक सहभाग तसेच विविध दात्यांनी शैक्षणिक संस्थेसाठी दिलेले योगदान व गाव,शाळा व लोकसमुदाय यांच्यात असलेला योग्य समवाय मुळे  परिसरातील गावांमधून 50 टक्के विद्यार्थी शिक्षणासाठी येत असल्याचे सांगून त्यासाठी एसटीची सुद्धा नियोजनबद्ध शिक्षक काळजी घेत असल्याचे आपल्या मनोगतातून सांगितले तसेच या शैक्षणिक वर्षाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी सामूहिक वर्गणीतून स्कूलला याप्रसंगी संगणक भेट दिले याबरोबरच काही विद्यार्थ्यांनी वर्गानुसार सामूहिक वर्गणी करून रोख पैसे देऊन शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली याबरोबरच नुकतेच निवृत्त झालेले नाईक रामभाऊ पाटील यांनी वस्तीगृहासाठी इन्वर्टर बॅटरी भेट दिली याप्रसंगी संस्थेचे सचिव सागरमलजी जैन यांनी आपल्या मनोगता तून नेहमीच्या शेरोशायरीच्या अंदाजामध्ये विद्यार्थ्यांना आजच्या डिजिटल शिक्षणात झालेली क्रांती मुळे शिक्षणात अमुलाग्र बदल झाल्याचे सांगून आपण त्यासाठी उच्च यश मिळवणे गरजेचे असल्याचे सांगून आपण आता ज्या कुमार वयात आहात यापुढे आपल्यातीलच काही श्रीमंतांची समवयस्कर मित्रांकडून आपल्याला व्यसनाच्या दलदल मध्ये ओढ ण्यासाठी कशा रीतीने पार्टी दिली जाईल पण आपण खिशात असलेल्या आपल्या आई वडिलांचा कष्टाची जाणीव असल्याने त्यांचा फोटो डोळ्यासमोर ठेवून त्यापासून कसं परावृत्त व्हायचं हे योग्य उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले  संस्थाध्यक्ष संजय दादा गरुड यांनी विद्यार्थ्यांना येणारा काळ हा स्पर्धेचा काळ असून तुमच्या मेरिटने आल्यावर   आपल्या स्कूलचे आपल्या गुरुजनांचे व आई वडिलांचे नाव मोठे करण्यासाठी कॉफीचा गैरवापर न करता अभ्यासपूर्ण वातावरणात सामोरे जाण्याचे सांगून अजूनही परीक्षेसाठी मदत लागल्यास गुरुजन तुम्हाला मार्गदर्शन करतील अचूक कोण एका दुसरा नापास झाल्यास तर त्यांनी खचून न जाता पुन्हा प्रयत्न करावे व मनात न्यूनगंड वाईट विचार न आणता पुन्हा जिद्दीने परीक्षेला सामोरे जाऊन यश संपादन करावे असे प्रेरणादायी विचार आपल्या मनोगत आतून मांडले कार्यक्रमाचे अध्यक्ष यु.यु.पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनातून  सांगितले की शारीरिक विकलांग आर्थिक परिस्थिती या दृष्टिकोनातून न जाता अशा परिस्थितीतून व जिद्दीतून मार्गक्रमण करत आपल्याच जिल्ह्यात क्लासवन अधिकारी होण्यापर्यंतची उदाहरणे आपल्या जवळच्या गावांमधले असल्याचे सांगून  विद्यार्थ्यांनी जिद्द,चिकाटी,व मेहनत याच्या जोरावर आपल्या ध्येय गाठण्यासाठी अभ्यासपूर्ण यापुढेही स्पर्धा परीक्षा सामोरे जाऊन परीक्षणा  गुणवत्तापूर्ण यश संपादित करावे असे आपल्या अध्यक्ष भाषणातून सांगितले याबरोबरच इतर मनोगत मध्ये स्थानिक सल्लागार समिती अध्यक्ष डॉ.वाय. जी पाटील यांनी मोफत शिक्षणाचा फायदा घेऊन उच्च यश संपादन करण्याचे सांगितले शा. व्य. समिती सदस्य विनोद आप्पा बाविस्कर यांनी मुलींबरोबरच मुलांनी सुद्धा अव्वल क्रमांक मिळवण्याचे आवाहन केले तर पत्रकार प्रा. यशवंत पवार यांनी नांद्रा हायस्कूलचे विद्यार्थी फक्त सामनेर केंद्रातच नाहीतर बोर्डातही चमकावे अशी अपेक्षा व्यक्त केली या कार्यक्रमाला सूत्रसंचालन प्रेमसिंग पाटील सर यांनी केले तर कार्यक्रमाचा आभार एल एम पाटील सर यांनी मांडले कार्यक्रमाचे यशस्वीते साठी  मुख्याध्यापक,पर्यवेक्षक,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, वस्तीगृह कर्मचारी  यांनी मेहनत घेतली

No comments