क्रिएटिव स्कूलला जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न नांद्रा ता.पाचोरा
( प्रा.यशवंत पवार)-
येथे क्रिएटिव्ह स्कूल ला सालाबादप्रमाणे महिला स्त्री शक्तीचा जागर व सन्मान करण्यासाठी व महिला भगिनी यांना व्यक्त होण्यासाठी खुले व्यासपीठ उपलब्ध होण्यासाठी विविध स्पर्धेचं आयोजन करून "चला खेळ खेळूया व भरघोस बक्षीस जिंकूया!" 'हळदी कुंकू समारंभ 2025' कार्यक्रम जागतिक महिला दिना निमित्त ठेवून तो उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून दुर्गाबाई फुलचंद पवार या होत्या यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कुरंगी,माहिजी,वरसाडे,आसनखेडा, लासगाव,बांबरुड,सा मनेर,नांद्रा,हडसन,पहान येथील महिला पालक प्रतिनिधी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी राष्ट्रमाता जिजाऊसाहेब, माता सावित्रीबाई फुले,भारत माता यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आले यावेळी स्वागतगीत शीतल पाटील, हर्षदा सोनार, आरती सोनवणे यांनी गायले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका अरुंधती राजेंद्र आरती सोनवणे शीतल पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. यशवंत पवार यांनी केले त्यामध्ये त्यांनी महिला दिनाचे महत्त्व सांगून विविध प्रकारच्या स्पर्धा कशा रीतीने खेळायचे आहेत त्याविषयी नियमावली सांगितली व महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या विविध स्पर्धेमध्ये बकेट द बॉल, कॅच द बिस्किट, लिंबू चमचा, फुगे फुगविणे,प्रश्नमंजुषा, भाषण स्पर्धा,उखाणे स्पर्धा विविध स्पर्धा घेऊन विजेता महिला भगिनींना मध्ये बकेट द बॉल स्पर्धेत विजेते अरुणा प्रभाकर पाटील आसनखेडा, माधुरी दादाभाऊ पाटील आसनखेडा, कावेरी विशाल पाटील नांद्रा, रुबीना विनोद तडवी बांबरुड,शितल रवींद्र पाटील सामनेर,जयश्री संजय भोई कुरंगी,तर फुगे फुगवणे मध्ये सपना राहुल नेरपगार सामनेर,स्केच द बिस्किट स्पर्धेत नीलिमा सागर पाटील बांबरुड,चेतना मनोज पाटील बांबरुड, शितल रवींद्र पाटील
सामनेर,लिंबू चमचा स्पर्धेमध्ये मनीषा ज्ञानेश्वर पाटील कुरंगी, आरती ज्ञानेश्वर पाटील कुरंगी,नीलिमा सागर पाटील बांबरुड, स्पीच व प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये नम्रता शिवाजी गायकवाड नांद्रा,जयश्री अनिल पाटील कुरंगी,योगिता तुषार जावळे कुरंगी, या विजेता ठरल्यात त्यांना योग्य बक्षीसे म्हणून घरगुती वापरातील साहित्य देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला याबरोबरच कार्यक्रमाला उपस्थित सर्व महिला भगिनी यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आली याप्रसंगी वर्षभरातील विद्यार्थ्यांचे विविध कलाविष्कार, स्पर्धा, क्रीडा सामने, सांघिक व वैयक्तिक खेळात विजेते विद्यार्थी यांना त्यांच्याच पालकांकडून, चषक,स्मृतिचिन्ह, गोल्ड मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले त्यामुळे
विद्यार्थ्यांचा आनंदही द्विगुणीत होता याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुंधती राजेंद्र,आरती सोनवणे, शीतल पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन शिक्षिका नम्रता पवार यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी कीर्ती सिनकर, प्रतीक्षा सिनकर, शीतल पाटील,आरती सोनवणे,अरुंधती राजेंद्र,गीता पटाईत, शालिनी भोई, पूजा सूर्यवंशी,चंद्रकलाताई तावडे,भगवान साबळे,नवल पाटील यांनी परिश्रम घेतले
क्रिएटिव स्कूलला जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न
Reviewed by Creative News
on
March 08, 2025
Rating: 5
No comments