नांद्रा येथील माध्यमिक विद्यालयातील पियुष मोरेचे 'नवोदय' परीक्षेत यश*
नांद्रा ता. पाचोरा(प्रतिनिधी)-(प्रा यशवंत पवार)
नांद्रे येथील दिव्यांग बांधव प्रशांत मोरे यांच्या मुलाने पियुष प्रशांत मोरे याने जिद्द,चिकाटी व स्वयम अध्यायासाठी घेतलेली मेहनत व त्याला मार्गदर्शन म्हणून लाभलेले गुरुजन यामुळे पियुष याला जवाहर नवोदय परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले असून तो इयत्ता सहावीपासून सीबीएससी अभ्यासक्रमाच्या साकेगाव येथील नवोदय स्कूलसाठी पात्र ठरला आहे या परीक्षेसाठी सर्वात अगोदर त्यांच्या आई-वडिलांनी स्वतः परिश्रम घेतले वडील प्रशांत मोरे दिव्यांग असून छोटे हॉटेल व्यवसायिक आहेत त्यानंतर आई शेती व गृहिणी आहेत तरी त्यांनी आपल्या पाल्याला नवोदय परीक्षेमध्ये जास्तीचे मार्गदर्शन व ज्ञान प्राप्त व्हावे म्हणून त्यांना कासोदा येथे एका मंदिरात अण्णा गुरुजी नावाचे शिक्षक नवोदयचे विद्यार्थ्यांसाठी मोफत क्लास घेत असल्याचे व त्यामुळे विद्यार्थ्यांना यशही मिळाल्याची माहित पडल्याबरोबरच त्यांनी कासोदा येथे पियुष व त्याचा लहान भाऊ रोहन यांना अभ्यासासाठी दाखल केले. त्यांच्या देखबालीसाठी आई व काकू यांनी त्या ठिकाणी तब्बल चार महिने रूम करून त्यांना राहण्या खाण्याची सोय ठेवली व त्यामुळे त्या लेकरांना आईच्या कष्टाची जाणीव झाली व अधिकचे नवोदय परीक्षेचे मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी ते अहोरात्र अभ्यासात गुंतले याबरोबरच पियुष याने इयत्ता तिसरी व चौथी मध्ये मंथन परीक्षेतही जिल्हा परिषद स्कूलचे सचिन जोशी सर यांच्या मार्गदर्शनाने तालुक्यात प्रथम क्रमांकाने यश संपादन केले होते याबरोबरच नवोदय परीक्षेतही सचिन जोशी सरांचे त्याला मार्गदर्शन लाभले त्यामुळेच या सर्व गोष्टीतून स्वतःची जिद्द शिक्षकांचे मार्गदर्शन आणि प्रश्नपत्रिकांचा सराव यामुळे पियुषला नवोदय परीक्षेत मोठे यश संपादन करण्यास मदत मिळाली व त्यांनी त्याच्या आई वडील यांचे कष्टाचेे फलित म्हणून त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पियुषणे अहोरात्र मेहनत घेतली त्याच्या यशाबद्दल आमदार किशोर आप्पा पाटील, गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे , गटशिक्षणाधिकारी विजय पवार , शिक्षण विस्तार अधिकारी समाधान पाटील व सौ. सरोज गायकवाड यांनी पियुष व मार्गदर्शक सचिन जोशी सरांचे अभिनंदन केले आहे.शाळेचे मुख्याध्यापक श्री राजेंद्र जगन्नाथ गोसावी, विद्या जोशी,प्रतिभा पाटील,स्मृती साबळे ,आप्पासाहेब पी.एस.पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.के.पाटील, भगवान सोनार, किरण सोनार, प्रविण सोनार,शिक्षक वृंद , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जिभु सातपुते, उपाध्यक्ष संदीप सुर्यवंशी,गुलाब बाविस्कर , स्वप्नील पाटील,सरपंच सुभाष तावडे , उपसरपंच शिवाजी तावडे,ग्रामपंचायत सदस्य योगेश सुर्यवंशी, किशोर खैरनार, अग्निपंखचे घनश्याम खैरनार, पत्रकार राजेंद्र पाटील, प्रा यशवंत पवार, यांच्या वतीने पियुषचे कौतुक व अभिनंदन पर सत्कार करण्यात आला.
नांद्रा येथील माध्यमिक विद्यालयातील पियुष मोरेचे 'नवोदय' परीक्षेत यश*
Reviewed by Creative News
on
March 18, 2026
Rating: 5
No comments