Breaking News

क्रिएटिव्ह स्कूल ला 'वार्षिक बक्षीस वितरण समारंभ " उत्साहात




क्रिएटिव्ह स्कूल ला 'वार्षिक बक्षीस वितरण समारंभ " उत्साहात 

नांद्रा ता. पाचोरा (प्रतिनिधी )-(प्रा यशवंत पवार)

येथील क्रिएटिव्ह इंग्लिश स्कूल येथे विद्यार्थ्यांच्या वर्षभरातील विविध सांस्कृतिक, क्रीडा व विविध बौद्धिक कौशल्याच्या विकास व्हावा म्हणून वर्ष भरात विविध स्पर्धा व कार्यक्रम घेण्यात आले यामध्ये विविध प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पालक प्रतिनिधी यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना मेडल, ट्रॉफी प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले यामध्ये पालक प्रतिनिधी मधून राहुल तायडे,मुकेश निंबा पाटील, प्रशांत जयस्वाल,दुर्गाबाई पवार,नम्रता गायकवाड,नवल पाटील,अहमद खान मेवाती,निलेश पाटील, चेतना पाटील, शितल पाटील,मनोज पाटील,पूजा भोई,रोशन शेख,गजानन ठाकूर,शिवाजी पाटील,सूर्यभान पाटील, राजीव पाटील, सुनीता शिंदे,जयश्री पाटील,आरती सूर्यवंशी,नाना सुतार,दुर्वास कोळी,समाधान पाटील, अशोक धनगर,रवींद्र पाटील पालकांची उपस्थिती होती

 वर्षभरात विद्यार्थ्यांच्या विविध प्रकारचा शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच सर्वांगीण विकास व्हावा या अनुषंगाने विद्यार्थ्यांना सुप्त कलागुणांना वाव मिळावा व विद्यार्थी यांच्यात स्टेटज डेरिंग निर्माण व्हावी याकरिता वकृत्व स्पर्धा,भाषण स्पर्धा,अभिनय व नाटिका स्पर्धा घेण्यात आल्या त्याबरोबरच विद्यार्थ्यांचे हस्त कौशल्य साठी चित्र काढणे, किल्ला बनवणे,भित्तिपत्रक, ग्रीटिंग कार्ड, पोस्टर, आकाश कंदील बनवणे, रांगोळी काढणे,तैलचित्र पोस्टर असे उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांना कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करण्यात आले त्याच प्रकारे बाह्य क्रीडा स्पर्धा मध्ये विविध प्रकारच्या धावणे स्पर्धा,उडी मारणे,तीन पायाची शर्यत, खुर्ची स्पर्धा, दोरी ओढणे व इतर बाह्य क्रीडा स्पर्धा यांचेही आयोजन करण्यात आले होते याबरोबरच प्रत्येक वर्गातून आदर्श विद्यार्थी म्हणून "*बेस्ट स्टुडन्ट ऑफ द इयर*"आवाड ही देण्यात आला यामध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मेडल,ट्रॉफी, प्रमाणपत्र देऊन त्यांचे कौतुक गौरव करण्यात आले यावेळी मिळालेल्या एकेक विद्यार्थ्याला दोन-तीन बक्षिसांच्या वर्षांमुळे विद्यार्थीही अतिशय आनंदित होती या कार्यक्रमाला प्रास्ताविक प्रा. यशवंत पवार यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती सोनवणे, हर्षदा सोनार,यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षिकावृंद नम्रता पाटील,कीर्ती सिंनकर,शालिनी भोई, शितल पाटील, ममता महाले,पूजा सूर्यवंशी, गुरुदास साबळे यांनी परिश्रम घेतले

No comments