आसनखेडा शिवारात विजेच्या तारेमुळे आग — शेतकऱ्यांचे मोठे नुकसान*
*नांद्रा ता.पाचोरा(प्रतिनिधी)*
(*प्रा. यशवंत पवार*)
तालुक्यातील आसनखेडा शिवारात विजेच्या तारांमुळे लागलेल्या आगीमध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गट क्रमांक 183 मधील शेतकरी भिला बाजीराव पाटील व ज्ञानेश्वर दिला पाटील यांच्या शेतात ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएसईबीच्या विजेच्या तारांमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे ठिणग्या पडून शेतातील कापून ठेवलेली कणसासह ज्वारी पेट घेतली. या आगीत सुमारे एक बिघा क्षेत्रातील ज्वारी पूर्णपणे जळून खाक झाली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील भूषण पाटील व वायरमन रवींद्र जाधव सोबत शेतकरी ज्ञानेश्वर पाटील भिला पाटील यांनी घटनास्थळी पाहणी केली तर आग आटोक्यात आणण्यासाठी शेतकरी अशोक देवराम पाटील उपसरपंच अमोल अशोक पवार गोलू पाटील राहुल एकनाथ पाटील सागर एकनाथ पाटील जगदीश प्रल्हाद पाटील नाना भिमराव पाटील ओम नारायण पाटील व इतर परिसरातील शेतकऱ्यांनी तत्काळ धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे उर्वरित सुमारे तीन बिघा क्षेत्रातील ज्वारी वाचवण्यात यश आले, अन्यथा नुकसान अधिक वाढण्याची शक्यता होती.
या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्यांचे सुमारे अंदाजे वीस पोते ज्वारीचे व चाऱ्याचे असे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, त्यांनी प्रशासनाकडे नुकसानभरपाईची मागणी केली आहे. तसेच, अशा घटना टाळण्यासाठी विजेच्या तारांची नियमित देखभाल व दुरुस्ती करण्याची मागणीही ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
आसनखेडा शिवारात विजेच्या तारेमुळे आग — शेतकऱ्यांचे मोठे नुकसान*
Reviewed by Creative News
on
April 26, 2026
Rating: 5
No comments